नाशिक : शहरातील पेशवेकालीन रहाडींमध्ये रंगणारानाशिकचारंगपंचमी सोहळा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असून, या उत्सवासाठी रहाडी खोदकामास सुरुवात झाली आहे. रहाडीतील रंगपंमची ही नाशिकची ओळख असून, नाशिककरांनी ही परंपरा आजही कायम राखली आहे. नैसर्गिक रंगाने आणि फुलांच्या सजावटीने भरलेल्या रहाडीत रंगखेळण्याच्या या उत्सवात नाशिककर आवर्जून सहभागी होतात. येत्या सोमवारी रंगपंचमी साजरी होणार असून, त्यासाठी आतापासून रहाडींच्या खोदकाला सुरुवात झाली आहे.जूने नाशिकसह पंचवटी परिसरातील रहाडींवर रंग खेळणाऱ्यांची मोठी संख्या आहे. सरदार चौक, तिवंधा लेन, दिल्ली दरवाजा येथील रहाडींमध्ये दरवर्षी मोठ्या जल्लोषात रंगपंचमी खेळली जाते. वीस ते पंचवीस फूट लांबी-रुंदी आणि पाच ते सहा फूट खोल अशी पुरातन रहाडीची रचना आहे. या रहाडीमध्ये नैसर्गिक रंगाने रंग तयार करून विधीवित पूजा झाल्यानंतर या रहाडीत उड्या घेतल्या जातात. काहींना यात आणून टाकले जाते. एकमेकांना राहडी ओढून त्यांना रंगाने चिंब भिजविले जाते. अत्यंत जुन्या अशा या दगडी रहाडी असून काहींचा शोध अलीकडेच लागला आहे.दिल्ली दरवाजा रहाडीबाबत संभ्रमदिल्ली दरवाजा येथील पारंपरिक रहाड यंदा बंद ठेवण्याचा निर्णय येथील कार्यकर्त्यांनी घेतला आहे. परिसरातील दोन कार्यकर्त्यांचे निधन तसेच नगरसेवक शाहू खैरे यांच्या काकू यांचे निधन झाल्याने यंदा रहाडीतील रंगपंचमी रंगण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे येथील रहाड सुरू करायची की नाही अशा विवंचनेत कार्यकर्ते आहेत. त्याचप्रमाणे पंचवटी परिसरातील सर्व रहाडी सुरू राहणार असून, दुपारनंतर काही रहाडी खोदकाम करण्यास सुरुवात झाली आहे. काही रहाडींची किरकोळ दुरुस्तीदेखील करावी लागली आहे. रहाडींची दुरुस्ती, रंगरंगोटी, डागडुजी करून रहाडीची दुरुस्ती केली जाणार आहे.
रंगपंचमीसाठी रहाड खोदकामाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 1:10 AM