सटाणा : कोरोनामुळे शाळा बंद आहेत; परंतु विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहावे म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिरावाडी येथील शिक्षकांनी विविध उपक्रमाची अंमलबजावणी सुरू केली आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून येथील शिक्षक, सरपंच, उपसरपंच व व्यवस्थापन समिती सदस्य यांनी कंबर कसली असून, घरोघरी ह्यघर तिथे फळाह्ण या उपक्रमांतर्गत प्रत्येक घरी स्वतः रंग व ब्रश घेऊन विद्यार्थ्यांना घरी अभ्यासासाठी फळे बनवून दिले आहेत.ज्या विद्यार्थ्यांच्या घरांच्या भिंती सिमेंटच्या आहेत त्यावर फळे बनविणे शक्य आहे. परंतु शाळेत शिकणारी शंभर टक्के मुले ही आदिवासी आहेत. त्यांची घरे कच्ची आहेत, मग फळा बनवायचा कसा? असा प्रश्न सतावत होता. त्यावर हिरावाडी शाळेचे शिक्षक शशिकांत शिंदे यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला घरी गुंडाळ फळा देऊन त्याचा गृह अभ्यास करून घेण्याचं ठरविलं. त्यासाठी १०० टक्के विद्यार्थ्यांना फळे मिळावेत म्हणून फळाभेट हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे ठरविले. या उपक्रमाला शिक्षिका सुवर्णा जाधव यांनी साथ दिली.शिक्षक शशिकांत शिंदे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ब्राह्मणगाव ग्रामपंचायतीचे सरपंच किरण अहिरे, उपसरपंच बापूराज खरे, माजी सरपंच सुभाष आहिरे, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आहिरे, रत्ना माळी, अरुण अहिरे, विनोद अहिरे, तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुदाम ढेपले, उपाध्यक्ष सुरेश माळी, सदस्य सुनील डांगळ, धर्मा पारखे, सयाजी अहिरे, शामराव माळी, रामदास माळी, लक्ष्मण डांगळ, रमेश अहिरे, लंकाबाई पारखे, राधा डांगळ यांनी शनिवारी (दि. १७) सुमारे ५० गुंडाळ फळे विद्यार्थ्यांना भेट दिले.हिरावाडी शाळेचा ह्यफळा भेटह्ण हा उपक्रम नावीन्यपूर्ण असून, निश्चितच विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होत आहे. हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यासाठी मार्गदर्शक असल्याचे सरपंच अहिरे यांनी केले.ही मोहीम हिरावाडी शाळेपुरती मर्यादित न ठेवता व्यापक स्वरुपात समाज सहभागातून राबविली जाईल, असे मत उपसरपंच बापूराव खरे यांनी मांडले. कोरोना काळात शाळेत सुरू असलेल्या उपक्रमांबद्दल सर्व सदस्यांनी शाळेतील शिक्षकांचे कौतुक केले.या उपक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी चित्रा देवरे, विस्तार अधिकारी विजय पगार, कैलास पगार, केंद्रप्रमुख दादाजी काकळीज यांचे मार्गदर्शन लाभले.
सटाण्यात फळा भेट मोहिमेची सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 7:43 PM
सटाणा : कोरोनामुळे शाळा बंद आहेत; परंतु विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहावे म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिरावाडी येथील शिक्षकांनी विविध उपक्रमाची अंमलबजावणी सुरू केली आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून येथील शिक्षक, सरपंच, उपसरपंच व व्यवस्थापन समिती सदस्य यांनी कंबर कसली असून, घरोघरी ह्यघर तिथे फळाह्ण या उपक्रमांतर्गत प्रत्येक घरी स्वतः रंग व ब्रश घेऊन विद्यार्थ्यांना घरी अभ्यासासाठी फळे बनवून दिले आहेत.
ठळक मुद्दे शिक्षकांकडून विविध उपक्रमांची अंमलबजावणी