दरवर्षी फेब्रुवारीच्या दुसऱ्या शनिवारी बाल येशू यात्रा मोठ्या प्रमाणात भरत असते. यात्रेला दरवर्षी देश-विदेशातून एक लाखाच्यावर भाविक हजेरी लावतात. रेल्वे, एसटी व शेकडो खासगी वाहनांनी भाविक येतात. त्यामुळे महामार्ग दोन दिवस वाहतुकीला बंद ठेवण्यात येतो. गेल्या ११ महिन्यांपासून संपूर्ण जगभरात कोरोनाचे सावट असल्याने यंदा यात्रा रद्द करण्यात आल्याची घोषणा पंधरा दिवसांपूर्वीच करण्यात आली होती. तरीही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. दक्षता म्हणून भाविकांना टप्प्याटप्प्याने आत सोडले जात असल्याची माहिती फादर ट्रेव्हर मिरंडा यांनी दिली. मंदिर परिसरात खेळणी, फळ, गृहोपयोगी वस्तू, खाद्यपदार्थ, पुस्तके आदींची दुकानांना यंदा बंदी घालण्यात आल्याने व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला. मुंबई, वसई या शहरातून मोजके भाविक खासगी वाहनाने यात्रेसाठी आले होते. मात्र, मुक्कामी न थांबता दर्शन घेऊन पुन्हा आपल्या गावी परतताना दिसत होते. यात्रेला भाविक कमी असल्याने पोलीस बंदोबस्तही पाहिजे त्या प्रमाणात दिसत नव्हता. (फोटो डेस्कॅनवर)
बाळ येशूच्या यात्रेला सुरुवात; काेरोनामुळे गर्दीला प्रतिबंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 4:14 AM