पाटोदा : अवकाळी पाऊस , दाट धुके, दव, तसेच दोन अडीच महिन्यांपासून असलेले ढगाळ हवामान व त्यानंतर आलेली थंडीची लाट अशा प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत तालुक्यातील शेतकऱ्यांनी दर्जेदार निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन घेतले. हंगामाच्या प्रारंभीच ३७ शेतकऱ्यांनी २१ हेक्टरवरील सुमारे साडेपाचशे टन द्राक्ष निर्यात रशिया व युरोप या देशात केली आहे. जुने २७ शेतकरी असून १० शेतकºयांनी प्रथमच निर्यात केली आहे. शेतकºयांना प्रतिकिलोस ८५ रूपये प्रमाणे दर मिळाला आहे. गेल्या चार पाच वर्षांपासून तालुक्यातील शेतकºयांचा द्राक्ष निर्यातीकडे कल वाढला आहे.गेल्या काही वर्षांपासून येवला तालुक्यातील शेतकरी निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन घेत असून दरवर्षी निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन घेणाºया शेतकºयांची संख्या वाढत असल्याने येवला तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. दुष्काळी तालुका असूनही शेतकरी वर्गाने शेती क्षेत्रात अमुलाग्र बदल घडून आणला आहे. अनेक शेतकरी पाणी टंचाईवर मात करीत दर्जेदार व निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन घेण्यास प्राधान्य देत आहे. गुणवत्तेत वाढ झाल्याने येथील द्राक्ष परदेशातही भाव खात आहे.तालुक्यातील शेतकरी रशिया युरोप तसेच बांगलादेश व अखाती देशात द्राक्ष पाठवतात .यावर्षी रशियात पाठवलेल्या द्राक्षास सरासरी साठ ते पासस्ट रु पये इतका भाव मिळत आहे तर युरोपात पाठवलेल्या मालास प्रतिकिलो ७५ ते ८५ रूपये इतका दर मिळत आहे. येवला तालुक्यातून यावर्षी द्राक्ष निर्यात करण्यासाठी ३६८ शेतकर्यांनी नावनोंदणी केली आहे.मागील वर्षी २६७ शेतकºयांनी द्राक्ष निर्यात केली होती त्यात यावर्षी नवीन १०१ शेतकºयांची भर पडली आहे. यंदा तालुक्यातून या शेतकºयांमार्फत २०२ हेक्टर मधून ५०५० टन द्राक्ष निर्यात होणार आहे.
येवल्यातून साडेपाचशे टन द्राक्ष निर्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 2:54 PM