खामखेडा : खामखेडा परिसरात गहू कापणी व काढणी साठी पंजाब प्रांतातील हार्वेस्टर दाखल झाले आहे.गेल्या दोन वर्षापुर्वी उन्हाळी कांद्याला चांगल्या प्रमाणात भाव मिळाल्याने शेतकऱ्याने मोठ्या प्रमाणात कांद्याची पिकांची लागवड केली होती. त्यामुळे गेल्या वर्षी गव्हाची लागवड कमी प्रमाणात केल्याने गव्हाच्या उत्पादनात घट झाली होती. त्यामुळे शेतकऱ्याला बाजारातून महागडा गहू विकत आणून खावा लागला होता. परंतु गेल्या वर्षी उन्हाळी कांद्याचे भरपूर प्रमाणात उत्पादन आल्याने कांदा कवडीमोल भावाने विकावा लागला. त्यामुळे उत्पादन खर्चही भरून निघाला नाही.चालु वर्षी पावसाळा चांगला झाल्याने विहिरींना चांगले पाणी असल्याने शेतकºयाने कांद्याबरोबर गव्हाची पेरणी केली आहे. तसेच या परिसरातील डाळींब बागा तेल्या रोगाने ेउध्वस्त झाल्याने डाळींबाच्या क्षेत्रात गव्हाची पेरणी करावी लागल्याने गव्हाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. पूर्वी अल्प बागायती शेती असल्याने शेतीच्या कामासाठी सहज मजूर उपलब्ध होत असे. त्यावेळेस खळे पध्दत असल्याने गव्हाची कापणी केल्या नंतर तो मळणी करून काढला जात असे. कारण गव्हाची मळणी करून काढल्यावर गव्हाच्या खुटाराचा उपयोग जनावारांना चारा म्हणून केला जात असे.आता आधुनिक युगामघ्ये शेती ट्रॅक्टरच्या साह्याने केली जाऊ लागली आहे. शेतकऱ्यांकडील बैलाची संख्या कमी जाली आहे. परंतु मघ्यंतरी गहू काढणीसाठी विजेवर व ट्रॅक्टरवर चालण्याºया यंत्रावर काढण्यात येत होती. आता बागायती शेतीत वाढ झाल्याने शेतीच्या कामासाठी मजुर उपलब्ध होत नाही. हार्वेस्टरच्या सहाय्याने गव्हाची काढणी केली जाते. त्यामुळे अगदी काही तासामघ्ये शेतातच काढणी केली जात असल्याने शेतकरी हार्वेस्टरला अधिक पसंती देत आहेत.कारण यामुळे वेळेची बचत होते. परंतु गहू काढणी झाल्यानंतर गव्हाच्या भूशाचे शेतात खत होते.गव्हाची पेरणी साधारण नोहेंबर महिन्यापासून केली जात तीे डिसेंबर महिन्याच्या मघ्यापर्यंत केली जाते. हे पंजाब प्रांतातील लोक साधारण फ्रेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पंजाब प्रांतातील व्यवसायासाठी महाराष्ट्र येतात.
खामखेडा परिसरात गहू काढणीस सुरवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 5:47 PM
खामखेडा : खामखेडा परिसरात गहू कापणी व काढणी साठी पंजाब प्रांतातील हार्वेस्टर दाखल झाले आहे. गेल्या दोन वर्षापुर्वी उन्हाळी कांद्याला चांगल्या प्रमाणात भाव मिळाल्याने शेतकऱ्याने मोठ्या प्रमाणात कांद्याची पिकांची लागवड केली होती. त्यामुळे गेल्या वर्षी गव्हाची लागवड कमी प्रमाणात केल्याने गव्हाच्या उत्पादनात घट झाली होती. त्यामुळे शेतकऱ्याला बाजारातून महागडा गहू विकत आणून खावा लागला होता. परंतु गेल्या वर्षी उन्हाळी कांद्याचे भरपूर प्रमाणात उत्पादन आल्याने कांदा कवडीमोल भावाने विकावा लागला. त्यामुळे उत्पादन खर्चही भरून निघाला नाही.
ठळक मुद्देखामखेडा : पंजाब प्रांतातील हार्वेस्टर गावात दाखल