शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
5
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
7
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
8
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
9
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
10
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
12
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
13
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
14
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
15
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
16
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
18
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
19
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
20
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट

पोलीस आयुक्तालयाच्या वतीने  सातपूरला जागर स्त्रीशक्तीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:23 AM

सातपूर : आदिशक्तीने महिषासुराचा वध केल्याने विजयोत्सव म्हणून दसरा सण साजरा केला जातो. त्याचप्रमाणे समाजातील अपप्रवृत्तींचा, दुर्जनांचा विनाश करण्यासाठी ...

सातपूर : आदिशक्तीने महिषासुराचा वध केल्याने विजयोत्सव म्हणून दसरा सण साजरा केला जातो. त्याचप्रमाणे समाजातील अपप्रवृत्तींचा, दुर्जनांचा विनाश करण्यासाठी स्त्रियांनी आपल्यात दडलेल्या आदिशक्तीला पुढे आणणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अभिनेत्री विद्या करंजीकर यांनी केले आहे.पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सातपूर येथील सौभाग्य लॉन्स येथे आयोजित जागर स्त्रीशक्तीचा या कार्यक्र मप्रसंगी ते बोलत होते. करंजीकर यांना आलेल्या स्त्रीविषयक चांगले-वाईट अनुभव विशद केले. अ‍ॅड. विद्या निकम यांनी महिलांविषयक कायदे व त्याची माहिती उपस्थित महिलांना दिली. कौटुंबिक वादाच्या सर्वात जास्त घटना पुणे व नागपूर शहरात घडत असून, हुंडाबळी यांसारख्या घटना अधिक असल्याचे सांगितले. यावेळी महिलांनी मीच दुर्गा व मीच आदिशक्ती असल्याची भूमिका मांडावी, असे आवाहन केले. यावेळी व्यासपीठावर सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते, नन्ही कली समन्वयिका ज्योती वाघचौरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे आदी उपस्थित होते. स्वागत सहायक पोलीस आयुक्त नखाते यांनी केले. यावेळी नगरसेविका माधुरी बोलकर, पल्लवी पाटील, सीमा निगळ, हेमलता कांडेकर, फरिदा शेख यांच्यासह परिसरातील शेकडो महिला उपस्थित होत्या. प्रास्ताविक सहायक पोलीस निरीक्षक भावना महाजन यांनी केले. पोलीस उपनिरीक्षक सरिता जाधव यांनी आभार मानले.महिलांनी सोशल मीडियाचा वापर जपून करावासध्या समाजात सायबर गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. समाजातील काही विकृत समाजकंटक महिलांचे फोटो डाउनलोड करत त्यावर छेडछाड करून कॉलगर्लसारख्या वेबसाईटवर फोटो अपलोड करण्याचे प्रकार पुढे येत आहे. त्यामुळे महिलांनी सोशल मीडियाचा वापर करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते यांनी केले.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयWomenमहिला