आरूढ माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय म्हाळसाकोरे येथील महाविद्यालयात गेल्या काही दिवसांपासून अर्थशास्त्र या विषयाला विषय शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. त्यासंदर्भात प्रहार विद्यार्थी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. परंतु शिक्षक उपलब्ध नसल्याने आंदोलन सुरू करण्याच्या अगोदर प्राचार्य रायते, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दौलतराव मुरकुटे, पोलीसपाटील संपत नागरे, राजेंद्र मुरकुटे, सायखेडा पोलीस प्रशासन यांच्या मध्यस्थीने व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांनी शिक्षण अधिकारी यांच्याशी फोनवर चर्चा करून शिक्षक उपलब्ध करून देऊ, असे लेखी आश्वासन दिले. प्राचार्य रायते यांनी लेखीपत्राद्वारे याबाबतची माहिती दिली. यावेळी प्रहार विद्यार्थी संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष दत्ता आरोटे, निफाड युवा तालुकाध्यक्ष जयेश जगताप, प्रहार विद्यार्थी संघटना तालुकाध्यक्ष अमोल ब्राह्मणे, तालुका संपर्कप्रमुख किशोर शिंदे, खानगावचे उपसरपंच शुभम आव्हाड, युवासेनेचे युवा नेते गणेश शिंदे, रोहित वैद्य, दीपक जगताप, गणेश सोनवणे, नारायण भोई, ऋषिकेश ब्राह्मणे, चेतन सोनवणे आदी उपस्थित होते.
फोटो - २५ म्हाळसाकोरे
म्हाळसाकोरे येथील आरूढ विद्यालयाचे प्राचार्य रायते यांच्याकडून लेखी आश्वासनपत्र स्वीकारताना प्रहार संघटनेचे दत्ता आरोटे व पदाधिकारी.
===Photopath===
250121\25nsk_7_25012021_13.jpg
===Caption===
फोटो - २५ म्हाळसाकोरे म्हाळसाकोरे येथील आरूढ विदयालयाचे प्राचार्य रायते यांच्याकडून लेखी आश्वासनपत्र स्वीकारताना प्रहार संघटनेचे दत्ता आरोटे व पदाधिकारी.