जानोरी : तालुक्यातील जानोरी येथील आदिवासी बांधवांच्या आपल्या विविध मागण्यांसाठी आदिवासी शक्ती सेनेच्या वतीने जानोरी येथे ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर सुरू असलेले उपोषण दुसऱ्या दिवशी दिंडोरी तहसीलदार पंकज पवार यांच्या मध्यस्थीने उपोषण आश्वासन दिल्यानंतर मागे घेण्यात आले. जानोरी येथील गट क्रमांक ११२४ मधील हद्दीबाबत असलेल्या तक्रारीची दखल घेत नसल्याचे निषेधार्थ आदिवासी शक्ती सेनेच्या वतीने सोमवार (दि. २०) पासून आंदोलन सुरू करण्यात आले होते. दिंडोरीचे तहसीलदार पंकज पवार व गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत नंबर ११२४/१ व २ वादग्रस्त गटाची पाहणी करून जोपर्यंत या गटाची सखोल चौकशी होत नाही, तोपर्यंत तेथे सुरू असलेल्या कंपाउंडच्या कामाला स्थगिती द्यावी; तसेच संबंधित व्यक्तीला याबाबत तत्काळ नोटीस द्यावी आणि गरज पडल्यास संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जानोरी ग्रामपंचायतचे प्रशासक अण्णा गोपाळ व ग्रामविकास अधिकारी के. के. पवार यांना देण्यात आले. सकारात्मक चर्चेनंतर तहसीलदार पंकज पवार यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना लिंबूपाणी देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली. यावेळी गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार, तलाठी किरण भोये, आदी उपस्थित होते. तहसीलदार यांनी उपोषणाची तत्काळ दखल घेऊन उपोषणस्थळी भेट देत प्रत्यक्ष पाहणी करून योग्य तो सकारात्मक निर्णय घेऊन सहकार्य केल्याबद्दल तहसीलदारांचे उपोषणकर्ते दत्तात्रय कोरडे, सोमनाथ वतार, रवींर बदादे, देवराम मोकाशी, ज्ञानेश्वर केंग, शंकर बेंडकुळे, गोरख जाधव, चंद्रकांत कडाळे, माधव मोरे, अंबादास फसाळे यांनी आभार मानले.
--------------------
जानोरी येथे उपोषणकर्त्यांशी सकारात्मक चर्चेतून उपोषणाची सांगता करताना तहसीलदार पंकज पवार व गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार, आदी उपस्थित होते. (२१ जानोरी उपोषण)
210921\21nsk_14_21092021_13.jpg
२१ जानोरी उपोषण