नांदुरवैद्य : जय जय राम कृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर करीत त्र्यंबकेश्वर येथे निवृत्तीनाथांच्या दर्शनाची आस घेऊन निघालेल्या अनेक दिंड्या सोमवारी (दि.२८) अस्वली स्टेशन, बेलगाव कुºहे परिसरात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.थंडीच्या कडाक्यातही विठ्ठल नामाचा गजर करीत लहान, थोर, महिला, वयोवृद्धही मोठ्या भक्तीभावाने वारकरी दिंड्यामध्ये सामील झाले आहे. सोमवारी पंधरा ते वीस दिंड्यांचा मुक्काम हा बेलगाव कुºहे येथे झाला. महाप्रसाद झाल्यानंतर हरिपाठ, भजन, कीर्तनाने रात्रभर जागर करीत भाविकांची जणू मांदियाळी जमली होती. पहाटे काकड आरती नंतर त्र्यंबकेश्वरकडे पालख्यांचे प्रस्थान झाले.दुष्काळी परिस्थितीमूळे त्र्यंबकेश्वर येथील निवृत्तीनाथांच्या यात्रेसाठी जाणाऱ्या दिंड्यामध्ये भाविकांची संख्या लक्षणीय वाढली आहे. लहान मुलांसह महिला भाविकांचाही सहभाग मुख्यत्वे वाढल्याचे दिसत होते.
बेलगाव कुºहे येथे त्र्यंबकेश्वर येथील निवत्तीनाथांच्या यात्रेसाठी दिंड्यांची मांदियाळी दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 9:02 PM
नांदुरवैद्य : जय जय राम कृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर करीत त्र्यंबकेश्वर येथे निवृत्तीनाथांच्या दर्शनाची आस घेऊन निघालेल्या अनेक दिंड्या सोमवारी (दि.२८) अस्वली स्टेशन, बेलगाव कुºहे परिसरात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.
ठळक मुद्दे दिंड्यामध्ये भाविकांची संख्या लक्षणीय वाढली आहे.