सिडको / पंचवटी : दिवाळीच्या तोंडावरच घंटागाडी कर्मचाºयांनी मंगळवारी (दि.१५) सकाळपासून कामबंद आंदोलन सुरू केल्यामुळे सिडको व पंचवटी परिसरात कचºयाचे ढीग साचल्याचे दिसून आले. घंटागाडी ठेकेदाराने कामगारांना पगारच दिला नसल्याने या कर्मचाºयांनी जोपर्यंत पगार मिळत नाही तोपर्यंत काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने महानगरपालिका आता या स्वच्छतेबाबत काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सिडकोतील सुमारे ४० गाड्या आणि दोनशेहून अधिक कर्मचाºयांनी या आंदोलनाला सुरु वात केली आहे. घंटागाडी ठेकेदाराने काही कर्मचाºयांना तर पाच ते सहा महिन्यांपासून पगार दिलेला नाही. सर्वच घंटागाड्या बंद ठेवल्या. कर्मचाºयांनी कामबंदचा निर्णय घेतल्याने ऐन दिवाळीत सिडकोत कचºयाचे ढीग दिसून येणार आहेत. घंटागाडी कर्मचाºयांच्या आंदोलनामुळे पंचवटी परिसरात घंटागाडी फिरकली नाही, परिणामी अनेक ठिकाणच्या भागात रस्त्याच्या कडेला कचरा साचून असल्याचे चित्र दिसून आले.
घंटागाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 11:33 PM