जिल्हयातील अवैध धद्यांचे समुळ उच्चाटन होण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई सुरू आहे. सध्या सुरू असलेल्या आय. पी. एल. सामन्यांदरम्यान लाईव्ह मॅच पाहुन लोकांकडून पैशांची बोली लावुन सट्टा खेळणारे व खेळविणाºया इसमांवर सत्वर कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक सिंह यांनी आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी सिन्नर ते घोटी रस्त्यावरील बेलु शिवारात आय.पी.एल. मॅचवर सट्टा लावणारे इसमांवर छापा टाकून सुमारे ५ लाख ७८ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. शनिवार (दि १३) रोजी आय.पी.एल. मालिकेत किंग्स इलेव्हन पंजाब व रॉयल चॅलेंजर बॅँगलोर या संघांचा क्रिकेट सामना सुरू होता, दरम्यान सिन्नर ते घोटी रोडवर एका फार्म हाऊस मध्ये सदर सामन्यावर बेटींग सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक कर्पे यांना मिळाली होती. त्यानुसार पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी सिन्नर ते घोटी जाणारे रोडवर बेलु गावचे शिवारात मातोश्री फार्म हाऊसवर छापा टाकला असता सदर ठिकाणी संशयीत प्रेम ताराचंद थावराणी, (रा. साई जैन कॉलनी, सौभाग्य नगर, देवळाली कॅम्प नाशिक), हरिश उर्फ बॉबी प्रेम थावराणी (रा. सौभाग्य नगर, साईजैन कॉलनी, देवळाली कॅम्प नाशिक) व जय अभय राव (रा. मातृछाया अपार्टमेंट, सौभाग्य नगर, देवळाली कॅम्प नाशिक) यांना जागेवरच ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतलेले सशंयीत हे वरील आय. पी.एल. सामन्यावर त्यांचे ताब्यातील लॅपटॉप व मोबाईलव्दारे लोकांकडुन पैसे लावुन व घेऊन सट्टा खेळतांना व खेळवितांना आढळून आले. सदर छाप्यात स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाला विविध कंपन्यांचे ७ मोबाईल फोन, १ डेल कंपनीचा लॅपटॉप, १ सोनी ब्राव्हीया कंपनीचा टी.व्ही., १ टाटा स्काय कंपनीचा सेट टॉप बॉक्स, तसेच एक फोक्सवॅगन कंपनीची व्हेन्टो कार असा एकुण ५ लाख ७८ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.अपर पोलीस अधीक्षक शमिष्ठा वालावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी माधव पडिले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक कर्पेे, पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील नाईक, नवनाथ गुरूळे, रामभाउ मुंढे, रवि शिलावट, दिपक अहिरे, शिवाजी जुंदरे, प्रितम लोखंडे, अमोल घुगे, संदिप हांडगे, हेमंत गिलिबले, निलेश कातकाडे, सचिन पिंगळ, प्रदिप बहिरम, गोकुळ सांगळे यांचा पथकात समावेश होता.
बेलू शिवारात आयपीएल मॅचवर सट्टा लावणाऱ्या संशयितांवर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 7:03 PM