पाथरे : येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत आपला पॅनलने दणदणीत विजय संपादन करीत एक हाती सत्ता संपादन केली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या सरपंचपदाच्या आरक्षणात पाथरे खुर्दचे सरपंचपद अनुसूचित जमाती (एसटी)साठी राखीव घोषित झाले. अनुसूचित गटातील विष्णू बेंडकुळे हे एकमेव विजयी उमेदवार असल्याने सरपंचपदाचा मान त्यांना मिळणे निश्चित झाले आहे.यापूर्वी बेंडकुळे यांनी पाथरे खुर्द ग्रामपंचायत तीन वेळा सदस्यत्वाची जबाबदारी पार पाडलेली आहे. पाथरे खुर्दच्या नऊ जागांसाठी झालेल्या लढतीत आपला पॅनलचे विष्णू बेंडकुळे यांच्यासह बाबासाहेब चिने, सुरेखा चिने, दत्तू चिने, दिनकर गुंजाळ, मंगल मोकळ, पूनम डोंगरे हे सात उमेदवार निवडून आले असून, ग्रामविकास पॅनलचे सीमा गुंजाळ व सुशीला गीते हे दोन उमेदवार निवडून आले आहेत. पाथरे खुर्दचे भावी सरपंच म्हणून विष्णू बेंडकुळे यांचा तालुक्याचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी सत्कार केला. आपला पॅनलचे आर.बी.चिने, विनायकराव चिने, महेंद्र चिने, अशोक चिने, समाधान गुंजाळ, बाळासाहेब डोंगरे, दिवाकर मोकळ, मच्छिंद्र बारहाते, भीमाजी पवार, संतोष बारहाते, रंभाजी चिने, राजू शिणारे, जगदीश गावडे, अशोक डोंगरे यांच्यासह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
पाथरे खुर्दच्या सरपंचपदी बेंडकुळे यांची वर्णी लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2021 6:24 PM
पाथरे : येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत आपला पॅनलने दणदणीत विजय संपादन करीत एक हाती सत्ता संपादन केली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या सरपंचपदाच्या आरक्षणात पाथरे खुर्दचे सरपंचपद अनुसूचित जमाती (एसटी)साठी राखीव घोषित झाले. अनुसूचित गटातील विष्णू बेंडकुळे हे एकमेव विजयी उमेदवार असल्याने सरपंचपदाचा मान त्यांना मिळणे निश्चित झाले आहे.
ठळक मुद्देराखीव प्रवर्गातील एकमेव उमेदवार