साकोरा : नांदगाव तालुक्यातील अनेक गावांत पंतप्रधान आवास योजनेच्या विद्यमान प्रतीक्षा घरकुल लाभार्थ्यांच्या प्रतीक्षा (ड) यादीत समावेश करण्यात आला आहे; मात्र त्या कामी गेल्या महिन्यात छाननीसाठी नियुक्त केलेले अधिकाऱ्यांनी सर्व्हे न केल्याने अनेक लाभार्थी घरकुलांपासून वंचित आहेत. सदर सर्व्हे त्वरित करावा, अशा मागणीचे निवेदन माजी उपसरपंच यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांनी नुकतेच गटविकास अधिकारी यांना दिले.नांदगाव तालुक्यातील अनेक गावांत प्रधानमंत्री आवास योजनेच्या विद्यमान ह्यडह्ण यादीचे सर्वेक्षण होऊन बरेच दिवस झाले असून, काही ग्रामपंचायत प्रशासन व लोकप्रतिनिधीनी अंतिम ह्यडह्ण यादी तयार करणेसाठी कोणताही पाठपुरावा केलेला नसल्यामुळे आजपर्यंत अनेक लाभार्थी या योजनेपासून वंचित राहिले आहेत. यावर्षी सलग झालेल्या जास्त पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांतील घरे जमीनदोस्त झाल्याने बऱ्याच कुटुंबांची राहण्याची परवड झाली. या कामी शासनाने योजनेच्या अंतिम (ड) यादीतील लाभार्थ्यांचे सर्व्हे करून सदर लाभार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. माजी उपसरपंच अतुल पाटील. योगेश पाटील, बाळासाहेब मोरे, मधुकर बोरसे, देवीदास बोरसे, तेजुल बोरसे, राकेश बोरसे, वसंत निकम, भारत सोनवणे, व्यंकट सुरसे, आदींनी निवेदनाची प्रत पंचायत समितीच्या सहायक गटविकास अधिकारी ढवळे यांना दिली.
सर्व्हेअभावी लाभार्थी घरकुलांपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 11:54 PM
साकोरा : नांदगाव तालुक्यातील अनेक गावांत पंतप्रधान आवास योजनेच्या विद्यमान प्रतीक्षा घरकुल लाभार्थ्यांच्या प्रतीक्षा (ड) यादीत समावेश करण्यात आला आहे; मात्र त्या कामी गेल्या महिन्यात छाननीसाठी नियुक्त केलेले अधिकाऱ्यांनी सर्व्हे न केल्याने अनेक लाभार्थी घरकुलांपासून वंचित आहेत. सदर सर्व्हे त्वरित करावा, अशा मागणीचे निवेदन माजी उपसरपंच यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांनी नुकतेच गटविकास अधिकारी यांना दिले.
ठळक मुद्देआवास योजना : गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन