नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ६५ वर्षांच्या आयुष्यात जन्मापासून उपेक्षा अवहेलना आणि धिक्काराचा सामना करूनही वंचितांचे, दलितांचे शोषण, गरिबी व रुढी परंपरा याविरोधात कोणत्याही विद्वेशाशिवाय विद्रोह करून सर्वसामान्यांना न्याय मिळवून दिला. परंतु वर्तमान स्थितीत राजकीय नेत्यांकडून राजकीय स्वार्थासाठी पावलोपावली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊनही विद्वेश आणि स्वार्थपूर्ण राजकारण केले जात असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ व्याख्याते विवेक घळसासी यांनी केले.ग्रामोदय शिक्षण संस्था आणि हिरे परिवारातर्फे रावसाहेब थोरात सभागृहात दिवंगत रामराव तथा पोपटराव हिरे यांच्या स्मृती व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफताना ‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ विषयावर ते बोलत होते. व्यासपीठावर माजी केंद्रीयमंत्री विजय नवल पाटील, महापौर रंजना भानसी, भदंत सुगत महास्तगी (बुद्धगया),भदंत हर्षबोधी (बिहार), भदंत सुगत, भदंत आर्यनाग माजी महापौर गुरुमित बग्गा, नगरसेवक दिनकर पाटील आदी उपस्थित होते. विवेक घळसासी म्हणाले, राजकीय पुढारी पदोपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा राजकीय स्वार्थासाठी उपयोग करतात.विविध वादग्रस्त विधानांच्या माध्यमातून समाजात संभ्रम निर्माण करण्याचे काम केले जाते. हेच पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यमग्नतेचा आदर्श न घेता संसदेत अनुपस्थित राहतात. अथवा अनाकलनीय गोंधळ घालून वेळ वाया घालवतात. त्यामुळे डॉ. बाबासाहेब यांचे विचार आणि वास्तविक जीवनचरित्र सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.दरम्यान, माजी महापौर गुरुमित बग्गा यांनी पोपटराव हिरे एक कुशल संघटक व राजकारणी असलेले अवलिया व्यक्तिमत्व असल्याचे सांगत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. प्रास्ताविक नगरसेवक योगेश हिरे यांनी केले. सूत्रसंचालन साहेबराव अहिरे यांनी केले.लोकसभा निवडणुकीत डॉ. बाबासाहेबांना पराभूत करण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न केले. परंतु याची कल्पना असूनही बाबासाहेबांनी विद्वेशाचे राजकारण न करता विद्रोहाची भूमिका घेतली. अशीच भूमिका बाबासाहेबांच्या अनुयायांसह सर्वच समाजाने घेऊन जातीयता, वर्णभेद, रुढी परंपरा, अंधश्रद्धा, अन्यायाविरोधात विद्वेशरहित विद्रोह करण्याची गरज असल्याचे घळसासी म्हणाले.
बाबासाहेबांंच्या नावाचा वापर फायद्यासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 1:31 AM
नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ६५ वर्षांच्या आयुष्यात जन्मापासून उपेक्षा अवहेलना आणि धिक्काराचा सामना करूनही वंचितांचे, दलितांचे शोषण, गरिबी व रुढी परंपरा याविरोधात कोणत्याही विद्वेशाशिवाय विद्रोह करून सर्वसामान्यांना न्याय मिळवून दिला. परंतु वर्तमान स्थितीत राजकीय नेत्यांकडून राजकीय स्वार्थासाठी पावलोपावली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊनही विद्वेश आणि स्वार्थपूर्ण राजकारण केले जात असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ व्याख्याते विवेक घळसासी यांनी केले.
ठळक मुद्देविवेक घळसासी : हिरे स्मृती व्याख्यानमाला