नाशिक : धनगर समाजाला अनुसूचित जमातींसाठी असलेल्या २२ प्रकारच्या सवलती लागू करण्यात आल्या आहेत. या संदर्भातील निर्णय राज्य मंत्रिमंडळाने जाहीर केला आहे. सरकारच्या या निर्णयासंदर्भात समाज बांधवांच्या जाणून घेतलेल्या प्रतिक्रिया.राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अनुसूचित जमातींमधील २२ सवलती धनगर समाजाला लागू होणार आहेत. यामध्ये मेंढपाळांसाठी जागा उपलब्ध करणे, विद्यार्थ्यांना वसतिगृहाची निर्मिती करणे, समाजासाठी दहा हजार घरकुल बांधणे, मेंढपाळांना चराई अनुदान देणे, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण देणे तसेच परीक्षा शुल्कात सवलती देणे यांसारख्या विविध सवलती लागू करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या ४० वर्षांपासून समाजातर्फे संघर्ष सुरू होता. सरकारने जो आज निर्णय दिला त्यासाठी आम्ही त्यांचे अभिनंदन करतो. पण आमच्या ज्या मूळ मागण्या आहे त्या अद्याप प्रलंबित ठेवण्यात आल्या आहे. तसेच समाजाला एसटी प्रवर्गाचे प्रमाणपत्र अपेक्षित होते त्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला नाही. तसेच जो निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीच्या आधी समाजासाठी वापरण्यात यावा.— बापूसाहेब शिंदे, प्रदेशाध्यक्ष, धनगर समाज संघर्ष समितीसरकारने दिलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. त्यांनी जो दिलेला निर्णयामुळे समाजासाठी फायदा होईल याची अपेक्षा आहे, इतर पक्षांनी धनगर समाजाला नेहमीच डावलले होते. पण भाजपा सरकार धनगर समाजासाठी नेहमीच सकारात्मक राहिले होते. या निर्णयाचा फायदा आमच्या मुला-मुलांसाठी होईल असे वाटते. त्यामुळे लोकशाहीचे पण मी आभार मानतो. तसेच सरकारने दिलेला निर्णयाची अंबलबजावणी लवकर करावी हीच अपेक्षा आहे.- आप्पासाहेब टरपले, कार्याध्यक्ष,धनगर समाज संघर्ष समितीया निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मी आभार मानतो. आमची मागणी ही शंभर टक्के पूर्ण झाली नसली तरी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आमचे आज हे एक पाऊल पुढे पडले आहे. या निर्णयामुळे मुख्यत: मेंढपाळाच्या मुलांना शिक्षणासाठी याचा फायदा होईल असे वाटते. तसेच इतर मागण्यांसाठी समाजासाठी पुन्हा प्रयत्न केले जातील.- डॉ. मेघश्याम करडे, जिल्हाध्यक्ष,धनगर समाज समिती, अमरावतीशासनाने जाहीर केलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. निर्णय अत्यंत चांगला असल्याने समाजाच्या वतीने आम्ही मुख्यमंत्री फडणवीस आणि पंतप्रधान मोदी यांचे आभार मानतो. मात्र त्याबाबतचा अध्यादेश त्वरित निघणे आवश्यक आहे. परंतु, जोपर्यंत खऱ्या अर्थाने लाभ मिळत नाही, तोपर्यंत त्याची शाश्वती वाटत नाही.- संगीता पाटील, यशवंत सेना महिला आघाडी अध्यक्षमुख्यमंत्री फडणवीसआणि रासपचे नेते महादेव जानकर यांनी मिळून घेतलेला निर्णय हा समाजासाठी मोठादूरगामी परिणाम करणारा ठरेल. कॉँग्रेसच्या शासकांनी गेल्या ७० वर्षांत जे आमच्या समाजाला दिले नाही, ते सारं काही भाजपाने समाजाला दिले असल्याने त्यांचे आम्हीआभारी आहोत.- राजेंद्र कोठारे, उत्तर महाराष्टÑ अध्यक्ष, रासप
लाभ जाहीर झाले, अंमलबजावणीही तत्पर व्हावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 12:40 AM