सिन्नर : १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत कवडीमोल दरात कांदा विक्री करणाºया शेतकºयांना राज्य शासनाने २०० रूपये प्रतिक्विंटल अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. तालुक्यात या दरम्यान सुमारे तीन हजार शेतकºयांनी ८५ हजार क्विंटल कांद्याची विक्री केल्याची नोंद असून आहे. या तीन हजार शेतकºयांना या अनुदानाचा लाभ मिळणार असल्याची माहिती सभापती विनायक तांबे, सचिव विजय विखे यांनी दिली.सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीसह नांदूरशिंगोटे, दोडी, नायगाव या उपबाजारांतही शेतकºयांनी कांद्याची विक्री केली आहे. अवघ्या एक ते दोन रूपये किलो दराने कांद्याची विक्री झाली. परिणामी शेतकºयांची कांद्याच्या वाढीव भावासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलने केली. काही शेतकºयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे कांदा विक्रीतून आलेल्या अल्प रकमेची मनिआॅर्डरही केली. शेतकºयांच्या उद्रेकाची दखल घेत राज्य शासनाने २०० रूपये प्रति क्विंटलप्रमाणे अनुदान देण्याचे जाहीर केले. त्यासाठी बाजार समितीकडून तातडीने माहिती मागितली आहेत. सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीस ८५ हजार कांदा विक्रीपोेटी एक कोटी ७० लाख रूपये अनुदान मिळणे अपेक्षित आहे. दरम्यान, कवडीमोल दराने कांदा विक्रीनंतर शासनाने किलोमागे केवळ दोन रूपये अनुदान जाहीर केल्याने शेतकºयांच्यात शासनाच्या धोरणाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
सिन्नर तालुक्यात ३ हजार शेतकऱ्यांना मिळणार कांदा अनुदानाचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 5:48 PM