नाशिक : शहरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी महापालिकेच्या वतीने शहरात हॉकर्स झोन हटविण्यात आले असले तरी त्यातून रस्ते अतिक्रमणमुक्त झाले, परंतु कॉलनी रस्ते आणि वसाहतींतील नागरिकांच्या जिवाला घोर वाढला आहे. अनेक शांत आणि मोकळ्या कॉलनी भागात महापालिकेने बळजबरी अतिक्रमण वसवल्याने नागरिक संतप्त झाले असून, संबंधित नगरसेवकांनाच त्याला सामोरे जावे लागण्याच्या शक्यता आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर वाहतुकीला अडथळे ठरणाºया अतिक्रमणांचे अन्यत्र स्थलांतर करण्यासाठी महापालिकेने हॉकर्स झोन राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार महापालिकेने शहराच्या विविध भागात या व्यवसायिकांना स्थलांतरित करण्यास प्रारंभ केला आहे. डिसूझा कॉलनीतील कॉलनी भागात तब्बल १५ टपरीधारकांना स्थलांतरित करण्यात आले असून, त्यामुळे नागरिकांच्या समस्या वाढल्या आहेत. येणाºया टपºया या कोणत्याही असू शकतात अगदी मांस विक्रेत्यांपासून आवाज करणारे वेल्डिंग व्यावसायिक, गॅरेज अशा कोणत्याही प्रकारच्या व्यवसायामुळे नागरिकांची झोप उडू शकते किंवा अन्य काही त्रास होऊ शकतो. याच शांत परिसरात येणाºया विक्रेत्यांच्या वाहनांची पार्किंग या सर्व प्रकारांमुळे नागरिकांत नाराजी असून, त्यासंदर्भात सोशल मीडिया आणि फेसबुकवर महापालिकेच्या कारभाराचा निषेध केला जात आहे. असाच प्रकार भोसला स्कूल मागील वनविहार कॉलनीच्या बाबतीत घडला असून, याठिकाणी सोसायटीच्या खुल्या जागेवर महापालिका अतिक्रमण करीत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. कॉलनीतील या मोकळ्या जागेवर नवरात्रोत्सव आणि अन्य उपक्रम साजरे होतात. मैदानाचा काही भाग काहीसा उंचवट्यावर असून, त्यामुळे येथे जलकुंभ बांधण्याची मागणी आहे. त्यासाठी सोसायटीने जागा देण्याची तयारी केली असतानादेखील ती सोडून महापालिकेने हॉकर्स झोन तयार केला आहे. विशेष म्हणजे हा कॉलनीरोड असल्याने आधीच वाहतुकीची समस्या असताना दुकानदारांना जागा दिल्यानंतर तेथे येणाºया ग्राहकांच्या गाड्यांमुळे रहिवाशांसाठी जागाच शिल्लक राहणार नाही, अशी अवस्था आहे. त्यामुळे नागरिक संतप्त झाले असून, हॉकर्स झोन रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
डिसूझा कॉलनीतील रहिवासी बेजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 12:41 AM