वरखेडा : दिंडोरी तालुक्यात होळी सण उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील विठ्ठलनगर येथील लक्ष्मी माता मंदिर होळीची विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी मानाचा ऊस व एरंड होळी वर आणून प्रत्येकाच्या घरातून पाच गोवऱ्या आणून होळी साजरी केली जाते. होळी सलग पाच दिवस घरोघरी खेळवली जाते. यावेळी शिवाजी कोळेकर, श्याम चव्हाण, घनश्याम चव्हाण, किशोर वाघमारे, अनिल साळुंके, अतुल चव्हाण, धीरज चव्हाण, सागर चव्हाण, प्रताप चव्हाण, मांगीलाल चव्हाण, कन्हैयालाल चव्हाण जामसिंग आरोळे आदींसह महिला अबालवृद्ध मिरवणुकीत सामील होत रंगांची उधळण करतात व धूलिवंदन सण समाज परंपरेनुसार साजरा करतात.गोसावी समाजाची आगळीवेगळी प्रथागोसावी समाजात होळीच्या दिवसापासून ते रंगपंचमीपर्यंत घरच्या कर त्या माणसाला महिलांच्या हस्ते दांडू व झाडूने मारण्याची प्रथा आहे त्यामुळे घरात सुख शांती नांदते व घरातील वातावरण हे समाधानकारक राहते, अशी भावना गोसावी समाजामध्ये रूढी परंपरानुसार रुजलेली आहे. आजही ही प्रथा विठ्ठलनगर येथे साजरी केली जाते.(21वरखेडा होळी)
धूलिवंदनाच्या दिवशी सवाद्य मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 4:55 PM
वरखेडा : दिंडोरी तालुक्यात होळी सण उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील विठ्ठलनगर येथील लक्ष्मी माता मंदिर होळीची विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी मानाचा ऊस व एरंड होळी वर आणून प्रत्येकाच्या घरातून पाच गोवऱ्या आणून होळी साजरी केली जाते.
ठळक मुद्देसर्व गोसावी समाज बांधव एकत्र येऊन होळी पेटवतात दुसऱ्या दिवशी धूलिवंदनाच्या दिवशी सवाद्य मिरवणूक काढतात. या मिरवणुकीत गावातून पाणी मिळवून ते होळीत टाकून होळी शांत केली जाते. मिरवणुकीनंतर गोसावी समाजाचे कुलदैवत लक्ष्मी माता मंदिरात पूजा केली जाते.