येवला : काश्मीरमधील सैतानी अत्याचार आणि आरोपींचा बचाव करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेत्यांविरोधात येवल्यात आज संताप मोर्चा काढण्यात आला. उत्तर प्रदेशातील अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार आणि आणि राजकीय नेत्यांकडून आरोपींना पाठीशी घालण्याचा जो प्रकार घडला या घटनेच्या निषेधार्थ येवल्यात सर्वपक्षीय मार्चा काढण्यात येऊन प्रांताधिकाºयांना निवेदन देण्यात आले. यावेळी सर्वपक्षीय कार्यकर्ते, पुरोगामी संघटना, महिला प्रतिनिधी प्रांताधिकारी कार्यालय परिसरात एकत्र आले. प्रांताधिकारी नांदगाव येथे असल्याचे समजल्याने मोर्चा तहसील कार्यालयाकडे वळवण्यात यावेळी बेटी बचाव, देश बचाव अशा घोषणा देण्यात आला. तहसील कार्यालय आवारात मोर्चाचे निषेध सभेत रुपांतर झाले. समताचे प्रा. अर्जुन कोकाटे, अजीज शेख, काझी रफीयुद्दीन, सुधा जोशी,यांनी तीव्र शब्दात भावना व्यक्त करून दोन्ही घटनांचा निषेध व्यक्त केला. निवेदनावर अर्जुन कोकाटे, भागवतराव सोनवणे, सुदाम पडवळ, प्रा. डॉ. अजय विभांडिक, भाऊसाहेब गमे, अजीज शेख, काजी रिफयुद्दीन , साजीद शेख, संजय पगारे, सुदाम पडवळ, महेंद्र पगारे, संजय सोमासे, नितीन जाधव, दीपक लोणारी, राजेंद्र बारे, निसार शेख, टी. एस. सांगळे, बन्सी पवार, राजेंद्र बारे, अॅड. एस. एस. शेख, कविता कोकाटे यांच्यासह अनेक महिला, नागरिकांच्या सह्या आहेत.
‘बेटी बचाव, देश बचाव : निषेध करीत महिलांनी दिले तहसीलदारांना निवेदन अत्याचार विरोधात येवलेकरांचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:09 AM
येवला : काश्मीरमधील सैतानी अत्याचार आणि आरोपींचा बचाव करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेत्यांविरोधात येवल्यात आज संताप मोर्चा काढण्यात आला.
ठळक मुद्देघटनेच्या निषेधार्थ येवल्यात सर्वपक्षीय मार्चा आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रकार