नाशिकरोड : विहितगाव येथील क्रिकेट बेटिंग प्रकरणी उपनगर पोलिसांनी नाशिकच्या आणखी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तुषार शहा आणि विकी जाट अशी या दोघांची नावे आहेत. हे दोघे नाशिकचे असून, शहा हा साफ्टवेअर आपरेटर आहे तर विकी हा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतो. त्यांची चौकशी पोलीस करत आहेत. याप्रकरणी उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहायक आयुक्त मोहन ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाजीराव महाजन व सहकारी तपास करत आहेत.राजकोट येथे गेल्या शनिवारी रात्री भारत-न्यूझीलंडदरम्यान टष्ट्वेन्टी टष्ट्वेन्टी क्रिकेट सामना झाला. त्यावर बेटिंग (सट्टा) खेळला जात असलेल्या विहितगाव वडनेरगेटजवळील साईसहवासनगरमधील रो-हाउसवर उपनगर पोलिसांनी छापा टाकला होता. घटनास्थळावरून चार जणांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात तब्बल २८ लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. त्यामध्ये पजोरो, गाडी, क्रुझ कार, दोन दुचाकी, २६ मोबाइल, लॅपटाप, दहा हजार रोख, थायलंडचे चलन असलेल्या आठ नोटा आदींचा समावेश आहे. त्यावेळी जावेद शेख अल्ताफ, बाबी ऊर्फ हरिष प्रेम थावराणी, इम्रान मलिक जखवाला, जय अजय राव या चौघांना पोलिसांनी अटक केली होती. फरार झालेल्या प्रेम ताराचंद थावरानी, समीर अ़निस थावरानी, विजेंद्र विनोद निर्मळकर, चेतन काशीनाथ पाटील, रोहित प्रकाश विंग यांना दुसºया दिवशी मध्यरात्री अटक केली. आता आणखी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
विहितगाव येथील क्रिकेट बेटिंग प्रकरणी बेटिंगप्रकरणी आणखी दोघे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 1:02 AM
विहितगाव येथील क्रिकेट बेटिंग प्रकरणी उपनगर पोलिसांनी नाशिकच्या आणखी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तुषार शहा आणि विकी जाट अशी या दोघांची नावे आहेत.
ठळक मुद्देभारत-न्यूझीलंडदरम्यान क्रिकेट सामनारो-हाउसवर उपनगर पोलिसांनी छापा टाकलाघटनास्थळावरून चार जणांना अटक