शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

भारत-न्यूझीलंड सामन्यावर बेटिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 12:36 AM

टी-२० सामना : चौघेजण ताब्यात; थायलंडचे चलन असलेल्या नोटा जप्त नाशिकरोड : राजकोट येथे शनिवारी झालेल्या भारत-न्यूझीलंड ट्वेन्टी-ट्वेन्टी सामन्यावर वडनेर येथील एका बंगल्यात बेटिंग खेळणाºया अड्ड्यावर उपनगर पोलिसांनी छापा टाकून चौघा जणांना अटक केली, मात्र पाच जण पळून जाण्यात यशस्वी ठरले. पोलिसांनी या कारवाईत दोन चारचाकी, दोन दुचाकी, २६ मोबाइल, लॅपटाप, दहा हजार रोख, थायलंडचे चलन असलेल्या आठ नोटा असा २८ लाखांचा ऐवज जप्त केल्याची माहिती गुन्हा शाखेचे उपायुक्त विजयकुमार मगर यांनी आज उपनगर येथे पत्रकार परिषदेत दिली.

टी-२० सामना : चौघेजण ताब्यात; थायलंडचे चलन असलेल्या नोटा जप्त

नाशिकरोड : राजकोट येथे शनिवारी झालेल्या भारत-न्यूझीलंड ट्वेन्टी-ट्वेन्टी सामन्यावर वडनेर येथील एका बंगल्यात बेटिंग खेळणाºया अड्ड्यावर उपनगर पोलिसांनी छापा टाकून चौघा जणांना अटक केली, मात्र पाच जण पळून जाण्यात यशस्वी ठरले. पोलिसांनी या कारवाईत दोन चारचाकी, दोन दुचाकी, २६ मोबाइल, लॅपटाप, दहा हजार रोख, थायलंडचे चलन असलेल्या आठ नोटा असा २८ लाखांचा ऐवज जप्त केल्याची माहिती गुन्हा शाखेचे उपायुक्त विजयकुमार मगर यांनी आज उपनगर येथे पत्रकार परिषदेत दिली.पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांना वडनेर येथील बंगल्यात क्रि केट सामन्यावर बेटिंग घेतली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार सहायक आयुक्त मोहन ठाकूर, वरिष्ठ निरीक्षक बाजीराव महाजन, उपनिरीक्षक बलराम पालकर, महेश शिंदे, गणेश जाधव, हवालदार कोकाटे, गिते, देशमुख आदींनी शनिवारी रात्री नऊच्या सुमारास विहितगाव-वडनेर गेटजवळील साई सहवासनगरमधील एका रो-हाउसवर छापा टाकला. त्याठिकाणी जावेद शेख अल्ताफ (३०, अंजुमन शाळा, गोसावीवाडी, नाशिकरोड), बाबी ऊर्फ हरिष प्रेम थावराणी (३०, साईजन कॉलनी, सौभाग्यनगर, नाशिकरोड), इम्रान मलिक जखवाला (३०, गिरीजा अपार्टमेंट, सौभाग्यनगर, नाशिकरोड), जय अजय राव (नानावली पार्कसमोर, लॅमरोड, नाशिकरोड) या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी तेथून प्रेम ताराचंद थावराणी (साईजन कॉलनी, सौभाग्यनगर), समीर अ़निस थावरानी (सिंधी कॉलनी, जेलरोड), वीजेंद्र विनोद निर्मळकर (विजय टॉवर, कॅनडा कार्नर, शरणपूररोड), चेतन काशीनाथ पाटील (गाडेकर मळा, देवळालीगाव), रोहित प्रकाश विंग (शांती निवास, सावरकरनगर, जेलरोड) हे पाच जण पळून गेले असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी या छाप्यात पेजोरो गाडी, क्रुझ कार, बुलेट, होंडा डिओ, लॅपटॉप, २६ मोबाइल, टीव्ही, व्हाईस रेकार्डर, सीमकार्ड, मेमरी कार्ड, रोख दहा हजार रोख, थायलंडच्या आठ नोटा असा २८ लाख ३५ हजारांचा ऐवज जप्त केला. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.