नाशिककरांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस रस्त्यावर असून त्यांना भयमुक्त वातावरण निर्माण करून देणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे. गुन्हेगारांची पाठराखण लोकप्रतिनिधींकडून केली जाणे हे चुकीचे आहे, त्यामुळे बेकायदेशीरपणे मोर्चा पोलीस ठाण्यावर आणणाऱ्या लोकप्रतिनिधींपासून मोर्चेकऱ्यांविरुध्द कारवाई करण्यात आल्याचे पाण्डेय यांनी स्पष्ट केले.
नाशिक पोलीस आयुक्तालय शहर परिमंडल-२च्या वतीने तपासी अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी गेल्या दोन महिन्यांत गुन्हे उघडकीस आणल्याबद्दल आयोजित सत्कार सोहळ्याप्रसंगी पाण्डेय बोलत होते. याप्रसंगी पोलिस उपायुक्त विजय खरात, अमोल तांबे, पौर्णिमा चौगुले, सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख, दीपाली खन्ना, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी, इंदिरानगर पोलीस ठाण्याचे निलेश माईनकर आदी उपस्थित होते.
यावेळी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेल्या गुन्ह्यांचा शोध लावत कामगिरी करणाऱ्या विविध पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना गौरविण्यात आले.