सध्या प्रत्यक्ष भेटीच्या व्यक्तीपलीकडे अनोळखी कंपन्या आणि हॅकर्सकडून गंडा घालण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. नाशिकमध्येदेखील अनेकांना गंडा घातला जात आहे. अशाप्रकारच्या प्रलोभनापासून दूर राहिले पाहिजे, त्यासाठी सद्सद्विवेक बुध्दीचा वापर केला पाहिजे असे सायबर तज्ज्ञ तन्मय दीक्षित यांनी सांगितले.
इन्फो...
लॉटरी आणि कुरिअरपासून राहा सावध
केस नंबर १
नाशिक शहरातील गंगापूररोड भागातील एका नागरिकाला पाच हजार डॉलर्सची लॉटरी लागल्याचा मेल आला. त्यांनाही जरा आनंद झाला. मेलमधील लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांना त्यांची व्यक्तिगत माहिती आणि त्याचबरोबर क्रेडिट- डेबिट कार्डाची माहिती विचारल्याने ते सावध झाले आणि त्यांनी जाणकारांशी संपर्क केला आणि त्यांच्या सल्ल्याने ते थोडक्यात वाचले अन्यथा बँक खाते रिकामे झाले असते.
केस नंबर २
नाशिकरोड येथील एका महाविद्यालयीन युवकाला मोबाइलवर मेसेज आला. त्यावर त्याने क्लिक केल्यानंतर लॉटरी क्लेम करण्यासाठी त्याला विशिष्ट रक्कम भरण्यास सांगण्यात आले. एका तज्ज्ञांशी त्याने संपर्क केला आणि पैसे भरले नाही म्हणून तो बचावला.
इन्फो...
ही घ्या काळजी...
१. कोणत्याही अनोळखी लिंकवर अथवा मेलवर क्लिक करू नका.
२. लॉटरी देण्याबाबत अनोळखी मेल आल्यास त्यातील व्याकरण तपासा, ते ओरिजनल कंपनीसारखेच असते.
३. लॉटरीसाठी आलेले मेल ब्राझिलमधील दाखवतात, प्रत्यक्षात ते झारखंड, उत्तर प्रदेश येथून आल्याचे मेलच्या मजकुराच्या तळाशी नमूद असते.
इन्फो...
वेबसाइटची सुरुवात एचटीटीपीएसपासून झाली आहे का?
- ओरिजनल वेबसाइट असेल तर त्याची सुरुवात एचटीटीपीएसपासून सुरुवात असेल तर खात्री करून घ्यावी ती अधिकृत वेबसाइट असते.
- बऱ्याच कंपन्याच्या वेबसाइटदेखील एचटीटीपीएसने सुरू होतात. अर्थात, त्या सुरू झाल्यानंतर ओरिजनल कंपनी आणि ड्युप्लिकेट यात काही ना काही फरक असतोच.
- ड्युप्लिकेट वेबसाइटमध्ये कंपनीचे नावाचे स्पेलींगमध्ये दोष ठेवला जातो किंवा मेलमधील ग्रामर तरी चुकीचे असते.
इन्फो..
फिशिंग ई-मेल्स
- नागरिकांना गंडा घालणारे अनेक ई-मेल्स सध्या पाठवले जातात. नागरिकांना जाळ्यात ओढणारे हे फिशिंग मेल्स असतात.
- अनेक मेल तपासले तर वेगवेगळ्या बँकांचे मेल दाखवले जातात. परंतु बारकाईने तपासले तर त्यांच्या लिंक अगदी एक सारख्याच असतात.