शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar On Sharad Pawar : "मी जी राजकीय भूमिका घेतली ती साहेबांना सांगूनच, आधी हो म्हणाले नंतर..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
2
Breaking: खळबळजनक! दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; पैकी एक तावडीतून सुटला
3
साईबाबा संस्थानला गुप्त दानावर कर द्यावा लागणार? हायकोर्टाने महत्वाचा निर्णय घेतला
4
राम रहीमला ६ वेळा पॅरोल देणाऱ्या माजी पोलीस अधिकाऱ्याचा विजय; भाजपमध्ये केला होता प्रवेश
5
"जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर करायचे काँग्रेसकडून शिकावे"; हरयाणा निकालावरुन ठाकरे गटाचा निशाणा
6
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
7
आजचे राशीभविष्य ९ ऑक्टोबर २०२४; प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल
8
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
9
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
10
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
11
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
12
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
13
एक्झिट पोल पडले तोंडावर; भाजपच्या जागांबाबत बहुतांश अंदाज फसले, निकालांबाबत होती उत्सुकता
14
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
15
घोळ सरेना, नाव ठरेना, अध्यक्ष मिळेना! शर्यतीत अनेक दिग्गज; पण, शिक्कामोर्तब कधी?
16
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
17
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
18
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
19
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
20
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत

चोवीस तासांत खुनाची उकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 6:04 PM

नांदगाव : अनैतिक संबंधाची वाच्यता होऊ नये म्हणून तालुक्यातील बोलठाण येथे एका पुरुषाचा खून करून त्याच्या प्रेताची परस्पर विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यास नांदगाव पोलिसांनी पकडून चोवीस तासांत खुनाची उकल केली आहे. तालुक्यातील बोलठाण येथे हा प्रकार घडला. ताराचंद बुधा जाधव (४२, रा. चिंचखेड तांडा, ता. कन्नड) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे.

ठळक मुद्देबोलठाण : अनैतिक संबंधावरून प्रकार

नांदगाव : अनैतिक संबंधाची वाच्यता होऊ नये म्हणून तालुक्यातील बोलठाण येथे एका पुरुषाचा खून करून त्याच्या प्रेताची परस्पर विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यास नांदगाव पोलिसांनी पकडून चोवीस तासांत खुनाची उकल केली आहे. तालुक्यातील बोलठाण येथे हा प्रकार घडला. ताराचंद बुधा जाधव (४२, रा. चिंचखेड तांडा, ता. कन्नड) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे.संशयित आरोपी प्रकाश शंकर वैद्य (२३, रा. ममदापूर, ता. येवला) याचे लग्न जमत नसल्याने तो मामाच्या गावी कामधंदा शोधण्यासाठी बोढरे, ता. वैजापूर येथे राहण्यास आला. मामांकडे शेळ्यांचे कळप असल्याने तो तेथेच कामधंदा करू लागला. मामा-मामीसह शेळ्या मेंढ्यांच्या कळपासोबत वस्तीवर राहू लागला. याच दरम्यान त्याचे मामीशी सूत जमले. याच दरम्यान जंगलात त्यांना शेळ्या चारताना ताराचंद बुधा जाधव याच्याशी भेट झाली. तोसुद्धा कामधंद्याच्या शोधात फिरत होता. त्याने संशयित आरोपी प्रकाश व त्याची मामी या दोघांचे अनैतिक संबंध बघितले. या अनैतिक संबंधाची त्याने मामाकडे वाच्यता करू नये म्हणून दि. ५ आॅगस्ट रोजी प्रकाश व ताराचंद हे बोलठाण येथे मद्यपानासाठी बसले. या दरम्यान दोघात अनैतिक संबंधावर बाचाबाची झाली. तेव्हा संशयिताने जवळच असलेली कुºहाड हातात घेऊन तिच्या उलट्या ताराचंदच्या डोक्यावर वर्मी घाव घातले. त्यात तो गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडला. ताराचंदचे प्रेत बोलठाण येथील बाजार समितीच्या बाजूला असलेल्या काटेरी कुंपणात फेकून दिले. सदर प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी चोवीस तासांत या खुनाचा छडा लावला आणि गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अनिल भवर, हवालदार रमेश पवार पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटक