नाशिक : जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघांसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. सर्वच मतदान केंद्रांवर अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांपैकी कोणी मतदान केंद्रावर पार्टी केली अथवा नियमबाह्य कामकाज केले तर त्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांत महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत आहे. इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवारही निवडणूक रिंगणात आहेत. एकूण १९८ उमेदवारांनी या निवडणुकीत आपले आजमाविण्यासाठी उडी घेतली आहे.
निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे, यासाठी निवडणूक विभाग दक्षता घेत आहे. आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून आतापर्यंत सुमारे तीन कोटी रुपयांची रक्कमही जप्त करण्यात आली आहे. चेकपोस्टवर तपासणी मोहीमही राबविली जात आहे. कर्मचारी एक दिवस अगोदरच केंद्रावर जाणार आहेत. या अधिकारी, कर्मचाऱ्यांना विविध सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात रोणार आहे.
२९२६ मतदान केंद्र
जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघांत ४९२६ केंद्र आहेत. नाशिक पश्चिम मतदारसंघात सर्वाधिक ४१३ मतदान केंद्र आहेत.
मतदान केंद्रांवर सीसीटीव्हीची नजर
जिल्ह्यातील सर्वच केंद्रांवर सीसीटीव्हीची नजर राहणार असून शहरातील सर्व मतदान केंद्र सीसीटीव्हीच्या अखत्यारीत आहेत. तर तर ग्रामीण भागातील सुमारे ५० टक्के मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत आहे. उर्वरित ठिकाणी रेंजची समस्या असल्याने त्या ठिकाणी वॉकी-टॉकीचा वापर केला जाणार आहे.
३ दिवस ड्राय डे... ■
मतदानप्रक्रियेदरम्यान दारू पिणाऱ्यांमुळे कायदा- सुव्यवस्था निर्माण होऊ शकते. ■ ही बाब लक्षात घेता मतदानप्रक्रियेदरम्यान तीन दिवस ड्राय असेल.
मागील निवडणुकीत काही केंद्रांवर धिंगाणा
मध्य नाशिकसह सुरगाणा आणि पेठ येथील काही मतदान केंद्रांवर गत निवडणुकीत काहीसा तणाव निर्माण झाला होता. तेथेही बंदोबस्त राहणार आहे.
मतदानासाठी निवडणूक विभागाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. अधिकारी, कर्मचारी एक दिवस अगोदर केंद्रावर जातील. सर्वांना सूचना देण्यात आल्या असून त्यानुसार त्याची कार्यवाही होईल. - डॉ. शशिकांत मंगरुळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, नाशिक