मोबाईलचा वाढता वापर हा विविध प्रकारच्या धोक्यांनाही निमंत्रण देणारा ठरतो. स्मार्टफोनचा वापरही अत्यंत स्मार्टपद्धतीनेच करायला हवा. कुठलेही मोबाईल ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी पडताळणी करण्यावरही भर द्यायला हवा, जेणेकरून आपल्या मूळ माहितीची स्मार्टपद्धतीने सायबर गुन्हेगारांकडून चोरी होण्याचा धोका टळेल. अलीकडे मोबाईलधारकांपैकी काही कंपन्यांच्या ठरावीक नावाने बहुतांश ग्राहकांना ‘सीम व्हेरिफिकेशन पेंडिंग’ असा मेसेज धाडला जात आहे. हा मेसेज टेक्स्ट स्वरूपात मोबाईलमध्ये येऊन धडकतो किंवा काही ‘फेक कॉल’देखील केले जात आहे. त्यामार्फत ग्राहकाची मूळ माहिती संबंधिकांकडून जाणून घेतली जात असून त्या माहितीच्याअधारे आर्थिक फसवणुकीचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक सजग राहणे गरजेचे आहे.
---इन्फो--
ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी....
ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यापूर्वी त्याची निर्मिती कोणी केली आहे, त्याची पडताळणी करून घ्यावी. सायबर गुन्हेगारीमधील हॅकर्स यांनी काही बँक बॅलन्सच्या नावानेसुध्दा ॲप उपलब्ध करून दिलेले आहे. ॲप्लिकेशन डाऊलोड करताना कुठल्याहीप्रकारची माहिती लोकेशन, फोटो, व्हिडिओ याच्या परवानग्या देऊ नये. ऑनलाईन व्यवहारासाठी वापर करताना अनावश्यकरित्या ॲप डाऊनलोड करू नये.
---इन्फो---
असा कॉल व मेसेज आल्यास सावधान
१) सीम व्हेरिफिकेशन पेंडिंगबाबतचा कॉल किंवा मेसेज आल्यास त्याकडे दुर्लक्ष करावे. कॉलवर बोलताना मातृभाषेचाच वापर करावा, जेणेकरून संवाद वाढण्याऐवजी तुटेल.
२)सीमकार्ड ब्लॉक होण्याचा धोका टाळण्याकरिता संबंधित हॅकर्सकडून जर आधारकार्ड, पॅनकार्डसारखे मूळ कागदपत्रांची मागणी होऊ शकते. अशावेळी कुठल्याही प्रकारची माहिती देऊ नये, आपला आधार क्रमांक किंवा पॅनकार्ड क्रमांक सांगू नये.
३) हॅकर्सकडून माहिती घेण्यासाठी फेक अर्ज तयार करून सोशल मीडियावरून व्हायरल करत ऑनलाईन पद्धतीने माहितीची चोरी केली जाते तसेच मेसेजवर क्लिक केल्यानंतर आपोआप एखादे ॲप्लिकेशन डाऊनलोड होण्यास सुरुवात होते आणि डेटा चोरी केला जातो.
--इन्फो--
अशी घ्या काळजी
आपल्या मूळ कागदपत्रांची माहिती कोणालाही सांगू नका हॅकर्सच्या कॉलवर आपल्या मातृभाषेत संवाद साधा. ओटीपीची विचारणा होऊन रकमेची मागणी सीम ब्लॉक हाेऊ नये म्हणून केली जाऊ शकते. याकडे पूर्णत: दुर्लक्ष करावे.
ऑनलाईन शॉपिंग करताना क्रेडिट कार्ड अथवा डेबिट कार्ड वेबसाईट, ॲपवर सेव्ह करून ठेवू नये. सिस्टीममध्ये ऑटो सेव्ह पर्याय निवडू नयेे.
---आकडेवारी---
२०१९- ४३
२०२०- ६३
२०२१ मे - १२
डमी फॉरमेट आर वर सेव्ह