उपनगर येथील श्री. भा. वि. जोशी महाराष्ट्र हायस्कूलमध्ये जागतिक ओझोन दिन ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात आला.
यावेळी विजय गोळेसर यांनी ओझोन दिन साजरा करण्याची आवश्यकता याबाबत मार्गदर्शन केले. पर्यावरण वाचवा स्वतःला वाचा अशा प्रकारचा संदेश त्यांनी दिला. प्रत्येकाने घरी तुळस लाऊन विविध आजारांपासून सुटका करून घ्यावी, असे त्यांनी सांगितले. मुख्याध्यापक सुरेश घरटे म्हणाले की, पर्यावरण वाचवणे अत्यंत गरजेचे आहे अन्यथा त्याचे गंभीर परिणाम आपल्याला प्रत्येकाला भोगावे लागतील. झाडे लावा झाडे जगवा हे कृतीत उतरवावे.
ओझोनची चळवळ उभी करणारे वृषाली जायभावे, तानाजी पाटोळे, बिंदू बेन वाघेला, केशव ठोंबरे, मोनिका चौधरी, चंद्रकांत कुलकर्णी, वंदना ठाकूर, सुनील सोनवणे, योगिता साळवे, प्रेरणा साबळे तसेच विद्यार्थी व पालक ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी झाले होते.