पिळकोस : कळवण तालुक्यातील भादवण ते गांगवन रस्त्याची मागील वर्षाच्या पावसामुळे अतिशय दयनीय अवस्था झाली असून, एका ठिकाणी रस्ता वाहून गेल्याने भगदाड पडले आहे. या रस्त्याचे डांबर उखडून रस्त्यावर खड्डे झाले असून, रस्त्यावर खडीचे साम्राज्य झाले आहे. हा दुरुस्त करून मिळावा, अशी मागणी या परिसरातून एका वर्षभरापासून होत आहे. याकडे दुर्लक्ष होत असल्याने शेतकरी बांधवांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालविणे अवघड झाले आहे. दुचाकी वाहन चालविणाºयांना पाठदुखीचा आजार सुरू झाला आहे.या रस्त्याने विसापूर, बिजोरे, चाचेर, धनगरपाडा या गावातील, विद्यार्थी, शेतकरी बांधव व शेतमाल तालुक्याला ट्रक्टरने घेऊन जाणाºया वाहनाचे नुकसान तर होत आहे. यामुळे पाठदुखी व कंबरेचे गंभीर आजार या परिसरातील शेतकरी बांधवांना जाणवू लागल्याचे सांगण्यात आले. हा रस्ता दुरुस्त करून वाहतुकीस योग्य करून मिळावा, अशी मागणी शीतलकुमार अहेर, नीलेश जाधव, मोहन जाधव, राहुल जाधव, बाबाजी जाधव, पृथ्वीराज जाधव, नंदकिशोर बच्छाव, सचिन खैरनार, सुधाकर जाधव, भूषण बच्छाव, कैलास बच्छाव, चिंतामन बच्छाव, विनोद खैरनार आदिंनी केली आहे.
भादवण ते गांगवन रस्त्यात भगदाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2017 11:24 PM