शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील  अवैध गुटखा व्यावसायिकावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 1:27 AM

भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील पंचशीलनगरमधील गुदामावर शनिवारी (दि़३०) सायंकाळी सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते यांनी पथकासह छापा टाकला़ या गुदामातून एक लाख ६८ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला असून, संशयित महम्मद गयास शेख (३४, रा़ पंचशीलनगर) विरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

नाशिक : भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील पंचशीलनगरमधील गुदामावर शनिवारी (दि़३०) सायंकाळी सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते यांनी पथकासह छापा टाकला़ या गुदामातून एक लाख ६८ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला असून, संशयित महम्मद गयास शेख (३४, रा़ पंचशीलनगर) विरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़  गंजमाळ परिसरातील पंचशील नगरमध्ये प्रतिबंधीत गुटख्याचा मोठा साठा तसेच विक्री होत असल्याची माहिती नखाते यांना मिळाली होती़ त्यानुसार शनिवारी सायंकाळच्या सुमारास या ठिकाणी छापा टाकला असता संशयित महंमद शेख हा गुटख्याचा साठा व विक्री करताना आढळून आला़ त्यांनी तत्काळ भद्रकाली पोलीस ठाणे तसेच अन्न व औषध प्रशासनाचे अन्न व सुरक्षा अधिकारी इंगळे व पाटील यांना बोलावून घेतले़अन्न व औषध प्रशासनाने या मालाचा पंचनामा केला असता विमल, हिरा, रॉयल अशा विविध कंपन्यांचा एक लाख ६८ हजार रुपये किमतीचा गुटखा पानमसाला आढळून आला़ दरम्यान, पोलिसांनी हे गुदाम सिल केले आहे़ पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलीस उपायुक्त विजय मगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते,  गुन्हे शाखेचे संदीप पवार, अनिल भालेराव तसेच भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंह सूर्यवंशी यांनी ही कारवाई केली़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय