शहरं
Join us  
Trending Stories
1
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
2
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
3
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
4
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
5
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
6
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
8
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
9
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
10
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
11
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
12
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
14
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
15
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
16
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
17
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
18
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
19
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!

भेंडी-पिंपळे ३३ केव्ही लाईनला भादवण गावाचा तिव्र विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2020 4:18 PM

पाळे खुर्द/पिळकोस : कळवण तालुक्यातील भेंडी २२० पारेषण येथून पिंपळे येथे सुरु असलेल्या नविन सबस्टेशनचे काम अद्यापही चालू असुन या कामाला भादवण गावाने विरोध दर्शविला आहे. संबधीत काम तात्काळ बंद न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा भादवण येशील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी दिला आहे.

ठळक मुद्देसंबधीत काम तात्काळ बंद न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा

पाळे खुर्द/पिळकोस : कळवण तालुक्यातील भेंडी २२० पारेषण येथून पिंपळे येथे सुरु असलेल्या नविन सबस्टेशनचे काम अद्यापही चालू असुन या कामाला भादवण गावाने विरोध दर्शविला आहे. संबधीत काम तात्काळ बंद न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा भादवण येशील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी दिला आहे.कळवण तालुक्यात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार सुरू असून या कामात संबधीत ठेकेदाराने व अधिकारींनी संगनमत करून ग्रामस्थांना विश्वासात न घेता दमदाटी करून काम बिनधास्तपणे सुरु ठेवले आहे. भेंडी ते पिंपळे दरम्यान भेंडी, बेज, गांगवण, भादवण, पिळकोस, ककाणे, खेडगांव, धनेर, गणोरे, मोकभणगी, दहयाने, चिंचपाडा मार्गे पिंपळे येथे नविन सबस्टेशनसाठी ३३ केव्हीची लाईन गेली असुन यात कोणत्याही ग्रामपंचायतींची रीतसर परवानगी कींवा ठराव महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने अथवा ठेकेदाराने घेतला नाही. या कामासंदर्भात कार्यकारी अभियंता रु पेद्र टेंभुर्णे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, संबधीत ठेकेदाराने मंत्रालयातून ३३ केव्हीचे काम मंजूर करून आणले आहे. यात आम्ही काही करू शकत नाही. जरी संबधीत ठेकेदाराने मंत्रालयातून काम मंजूर करून आणले असेल. पण काम बेकायदेशीरपणे करण्यास मंत्रालयाने परवानगी दिली आहे का? असा प्रश्न ग्रामस्थांना पडत आहे. भादवण गावासह ईतर कोणत्याही गावांची या कामाची परवानगी किंवा ठराव संबधीतांने घेतला नसल्याची माहीती स्थानिक ग्रामसेंवकांनी दिली आहे. या कामाला परीसरातून विरोध असून हे काम तात्काळ बंद करावे अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इषारा भादवणचे अभिमान चव्हाण, रामदास जाधव, बाळासाहेब जाधव, दिलीप जाधव, रमेश जाधव, हिरामण जाधव, शरद जाधव, बाबाजी जाधव, दिलीप जाधव, ज्ञानेश्वर खैरनार, एकनाथ जाधव व ग्रामस्था तसेच शेतकऱ्यांनी दिला आहे.प्रतिक्र ीया ...भेंडी ते पिंपळे दरम्यान गेलेल्या ३३ केव्ही लाईनला आमचा तिव्र विरोध असून, भादवण ग्रामपंचायतीची संबधीत अधिकारी व ठेकेदाराने ठराव घेतलेला नाही. ही लाईन भादवण गावातून गेल्यास शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे . यात काही जिवीतहानी झाल्यास त्यला म वीज वितरण कंपनी जबाबदार राहील.- रामदास जाधव, ग्रामस्थ, भादवण.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतelectricityवीज