सिडको : राणेनगर येथील वामनराव सोनवणे प्रतिष्ठानतर्फे आयोजित दिवाळी पाडव्यानिमित्त मेघमल्हार प्रस्तुत भावगीत व भक्तिगीतांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सूर निरागस हो.., मेरे वतन के लोगो.. आदी गीतांनी रसिक मंत्रमुग्ध झाले.राणेनगर येथील स्वामी विवेकानंदनगर परिसरातील मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्र माप्रसंगी गायिका मृण्मयी पाटील, मीनल धोडपकर, विलास म्हसदे, गणेश कड या गायकांनी रसिकांना मराठी, हिंदी भावगीत व भक्तिगीते सादर करून मंत्रमुग्ध केले. यावेळी किबोर्डची साथ अतुल गांगुर्डे यांनी दिली, तर आॅक्टोपॅडची साथ नरेश लोखंडे, तबला व ढोलकीची साथ महेश धोडपकर यांनी दिली. ध्वनी व्यवस्था कैलास काळे यांनी पाहिली. यावेळी गायकांनी सूर निरागस हो.., मेरे वतन के लोगो.., गुलाल उधळीत रंग.., बोलावा विठ्ठल..., उठी श्रीरामा..., जेजुरीच्या खंडेराय.. यांसह विविध मराठी, हिंदी भावगीत व भक्तिगीते सादर केली. या कार्यक्र माचे आयोजन सोनवणे प्रतिष्ठानच्या वतीने महिला माजी नगरसेवक सुमन सोनवणे, राहुल सोनवणे यांनी केले होते.या कार्यक्र माप्रसंगी बाळासाहेब सांगळे, रवि भालेराव, राजाभाऊ नेरकर, विजू भारती, परशुराम ठाकरे, डॉ. प्रभाकर भोकरे, राजू सूर्यवंशी, नागेश काटकर, बाळ भाटीया आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
भावगीत, भक्तिगीतांचा कार्यक्रम रंगला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 12:42 AM