भगुर : भगूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क न वापरणाºया नागरिकांना शंभर रुपये दंड करण्याचा निर्णय नगर पालिकेने घेतला आहे.शासनाच्या 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' कार्यक्रमानुसार भगुर नगर पालिकेचे नगराध्यक्ष अनिता करंजकर, मुख्याधिकारी प्रतिभा पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेन्यात येऊन भगुर शहरात नगरसेवक, आरोग्य सेवक संयुक्तपणे प्रत्येक घरोघरीं जावुन आजारी व्यक्तींची तपासणी करण्याचे ठरविण्यात आले. तसेच गावात ज्या व्यक्तीच्या तोंडाला मास्क नसेल त्या व्यक्तिकडून शंभर रुपये दंड आकरन्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, नगर पालिकेने घेतलेला निर्णय योग्य असला तरी, कोरोना रोखण्यासाठी नगर पालिकेनी भगुरच्या जनतेसाठी काय उपयोजना केल्या आहेत, ते जनतेसाठी जाहीर करावे, मगच जनतेकडून दंड आकरन्यात यावा अशी मागणी मनविसेचे सुमित चव्हाण, कैलास भोर, शाम देशमुख, राजेश गायकवाड़, प्रमोद कुवर, संतोष सोनवणे, विकास मोरे, यश राजपूत, कल्पेश बोराडे यांनी केली आहे(फोटो ल्ल२‘ वर भगूर):- भगुर शहरात विना मास्क वापरणाºयाना दंड करताना पालिका कामगार.