येथील आव्हाड कुटुंबातून यात्रेच्या आदल्या दिवशी भैरवनाथ मंदिरात अभिषेक व सत्यनारायणाची पुजा करण्यात आली यात्रेसाठी देवाला स्नान घालण्यासाठी कोपरगाव येथून गोदावरीचे पाणी कावडी करून पायी आणले व यात्रेच्या दिवशी कालअष्टीमीला गावातून काठी व कावडीचे पूजन उपसंरपच, सदस्य व भजनी मंडळ यांच्या हस्ते करण्यात आले. काठी व कावडीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. ‘भैरवनाथ महाराज की जय’ च्या जयघोषाने राजापूर परिसर दणाणला होता. कावडी भाविकांचे पाय पोळू नये म्हणून विठ्ठल पुंजाबा वाघ व रामभाऊ बोडखे यांनी पाण्याची व्यवस्था केली होती. या यात्रेनिमित्ताने शांताराम चव्हाण दहिवतकर या लोकनाट्य तमाशा मंडळाचे आयोजन करण्यात आले होते. .मागील वषीॅ भैरवनाथ यात्रेत्सवाच्या उरलेल्या वर्गणीतून राजापूर माध्यमिक विद्यालयासाठी पिण्याच्या पाण्याची टाकी बांधण्यात आली होती.
राजापूरला भैरवनाथ महाराज यात्रोत्सव उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 6:08 PM