देवळाली कॅम्प : नवसाला पावणारा ‘भैरोबा’ अशी भाविकांची श्रद्धा असलेल्या खेड येथील प्राचीन श्री भैरवनाथ मंदिराच्या दोन दिवसीय यात्रोत्सवाची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. नवसाला पावणारा भैरोबा अशी श्रद्धा असलल्या खेड येथील श्री भैरवनाथ मंदिराच्या यात्रोत्सवानिमित्त बुधवार (१७ एप्रिल) दुपारी १ वाजता खेडगावातून मंदिरापर्यंत रथाची मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने रथाची सजावट करण्यात आली आहे. तसेच गुरुवारी मुख्य यात्रोत्सवानिमित्त सकाळी ८ वाजता अभिषेक, महाआरती होणार आहे. सकाळी ९ वाजता कावडीचा कार्यक्रम, दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल. सायंकाळी त्रिकाल आरती करण्यात येणार आहे. यात्रेनिमित्त मंदिराच्या परिसरात विविध वस्तू विक्रीची दुकाने थाटण्यात आली असून, मंदिराला रंगरंगोटी व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.कौल लावण्याची प्रथाभैरोबा मंदिरात लग्नानंतर नववधू-वर एकत्रितरीत्या दर्शन घेऊ शकतात. मात्र इतर वेळेस फक्त पुरूषच भैरोबाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची परंपरा आहे.दर रविवारी मंदिरात कौल लावण्याची प्रथा आहे. भाविकांनी प्राचीन भैरोबा मंदिराच्या यात्रोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रामस्थांनी केलेआहे.
खेड येथील भैरवनाथ यात्रोत्सवाची तयारी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 1:21 AM