लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : ‘सियावर रामचंद्र की जय, पवनसुत हनुमान की जय’ असा जयघोष करत अयोध्येत होणाऱ्या राममंदिर भूमिपूजन सोहळ्यानिमित्त पंचवटीतील विविध मंदिरांत भजन, कीर्तन आणि रामरक्षा स्तोत्रपठण करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.पंचवटीत असलेल्या मंदिर-मठात साधू-महंतांनी सकाळी रामाच्या प्रतिमेचे पूजन केले, तर मंदिराबाहेर रांगोळी रेखाटून मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. काळाराम मंदिरात सकाळी नित्य पूजा झाली. त्यानंतर अयोध्येत उभारल्या जाणाºया मंदिराच्या भूमिपूजनानिमित्त भजन, कीर्तन आणि रामनाम जप करण्यात आला.या पार्श्वभूमीवर रामकुंडावर भाविकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने व कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्यामुळे खबरदारी म्हणून पोलीस प्रशासनाने राममंदिर, रामकुंड आणि गंगाघाट परिसरात लोखंडी बॅरिकेडिंग करून वाहतुकीसाठी रस्ते बंद केले होते. राममंदिर तसेच रामकुंडावर जागोजागी पोलीस कर्मचारी, शीघ्र कृती दलाचे जवान तैनात करण्यात आल्याने परिसराला काहीकाळ पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. काळाराम मंदिरात सकाळी दैनंदिन पूजा व आरती करण्यात आली. राममंदिर मुख्य गाभाºयात रामाची आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. मंदिराला विद्युत रोषणाईदेखील करण्यात आली होती. जुना आडगाव नाक्यावर असलेल्या पंचमुखी हनुमान मंदिरात सकाळपासून रामनाम जप व रामरक्षा स्तोत्रपठण सुरू होते. महंत भक्तिचरणदास यांच्या हस्ते व मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत रामाच्या प्रतिमेचे पूजन करून हनुमान चालिसा पठण करण्यात आले.अयोध्येत राममंदिर उभारणी कामास सुरुवात झाल्याने आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
पंचवटीत मंदिरांमध्ये भजन, कीर्तन रंगले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 01:44 IST
पंचवटी : ‘सियावर रामचंद्र की जय, पवनसुत हनुमान की जय’ असा जयघोष करत अयोध्येत होणाऱ्या राममंदिर भूमिपूजन सोहळ्यानिमित्त पंचवटीतील विविध मंदिरांत भजन, कीर्तन आणि रामरक्षा स्तोत्रपठण करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
पंचवटीत मंदिरांमध्ये भजन, कीर्तन रंगले
ठळक मुद्देरामकुंड आणि गंगाघाट परिसरात लोखंडी बॅरिकेडिंग करून वाहतुकीसाठी रस्ते बंद केले