शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
2
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
5
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
6
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
7
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
8
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
9
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
10
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
11
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
12
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
13
नाशिकमध्ये येऊन गेले सर्वपक्षीय दिग्गज नेते; राष्ट्रीय नेतृत्वापासून सर्वोच्च नेत्यांच्या प्रचारसभा
14
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
NTPC Green Energy IPO: आजपासून ₹१०००० कोटींचा IPO गुंतवणूकीसाठी खुला, काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
17
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा
18
गाजरांमुळे अमेरिकेत भीतीचं वातावरण! सर्व स्टोअरवरून परत मागवले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
दिल्लीत विषारी धुके, ट्रकला प्रवेशबंदी, प्रकल्पांची कामेही स्थगित
20
सलमानसमोर बोलती बंद, आता Bigg Boss 18 मधून बाहेर आल्यावर अश्नीर ग्रोव्हर काय म्हणाला?

रस्त्यावरील भाजीबाजार, पंचवटीकर बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 12:29 AM

भाजीबाजार म्हटले तर नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत अत्यावश्यक बाब आहे. परंतु कुठेही आणि कसेही सुरू होणारे भाजीबाजार मात्र वाहतुकीच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत आहे. पंचवटी परिसरातील विशेषत: महामार्ग तसेच वाहनांची वर्दळ असलेल्या मुख्य वाहतुकीच्या रस्त्यावरच दैनंदिन तसेच आठवडे भाजीबाजार भरत असल्याने आठवडे भाजीबाजाराच्या दिवशी तर वाहतुकीसह पादचारी मार्गाला बे्रक लागत आहे.

पंचवटी : भाजीबाजार म्हटले तर नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत अत्यावश्यक बाब आहे. परंतु कुठेही आणि कसेही सुरू होणारे भाजीबाजार मात्र वाहतुकीच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत आहे. पंचवटी परिसरातील विशेषत: महामार्ग तसेच वाहनांची वर्दळ असलेल्या मुख्य वाहतुकीच्या रस्त्यावरच दैनंदिन तसेच आठवडे भाजीबाजार भरत असल्याने आठवडे भाजीबाजाराच्या दिवशी तर वाहतुकीसह पादचारी मार्गाला बे्रक लागत आहे. रस्त्यावर भरणाऱ्या दैनंदिन तसेच आठवडे भाजीबाजारामुळे भाजीपाला विक्रेते तसेच शेकडो ग्राहकांचा जीव धोक्यात येत असला तरी याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने रस्त्यावरचे भाजीबाजार अपघाताला निमंत्रण ठरताहेत.  विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांत महापालिकेने वाजतगाजत हॉकर्स झोन तयार केले आहेत. मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी तर दूरच उलट रिक्त झालेल्या जागांवर नवीन अतिक्रमणे होत असल्याने नागरिक बेजार झाले आहेत.पंचवटी विभागातील महामार्गालगत असलेल्या हिरावाडी, कमलनगर चौफुली, हनुमाननगर, तारवालानगर ते अमृतधाम चौफुली रस्त्यावर दर सोमवारी आठवडे बाजार भरतो. यातील हनुमाननगर येथील भाजीबाजार काही महिन्यांपूर्वीच निलगिरी बाग परिसरात स्थलांतरित करण्यात आलेला आहे. तर दर शनिवारी अमृतधाम चौफुलीवर भरणारा आठवडे भाजाीबाजार सध्या अयोध्यानगरी परिसरातील नागरी वसाहतीत असलेल्या रस्त्यावर भरत आहे. हिरावाडीतील (कमलनगर) परिसरात दर सोमवारी भरणाºया आठवडे बाजाराची व्याप्ती तर दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. रिंगरोडवर बसलेला भाजीबाजार आता एसएसडीनगर रस्ता, अभिजितनगरपर्यंत पसरलेला आहे. सोमवारच्या दिवशी तर वाहने सोडाच परंतू नागरिकांनादेखील पायी चालण्यासाठी कसरत करावी लागते. या आठवडे बाजारामुळे क्रीडा संकुलकडून येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प पडत असल्याचे चित्र दिसून येते. या भाजीबाजारात भरेकरी विशेषत: शेतकरी वर्गाची संख्या मोठी असल्याने त्यांना आठवडे बाजारासाठी प्रशासनाने तात्पुरती का होईना जागा करून देणे गरजेचे आहे, मात्र प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने सध्या तरी शेकडो विक्रेत्यांना व भाजीपाला खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना जीव धोक्यात घालूनच भाजीबाजारात यावे लागत आहे.अशीच परिस्थिती दिंडोरीरोड तसेच पेठरोडवर भरणाºया दैनंदिन भाजीबाजाराची आहे. सायंकाळच्या सुमाराला तर या रस्त्याने वाहने नेताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. अनेकदा या रस्त्यावर किरकोळ अपघात घडतात. भाजीबाजार नागरिकांसह प्रशासनाची डोकेदुखी ठरत असली तरी या भाजीबाजाराबाबत प्रशासनाकडून कोणताही तोडगा काढला जात नाही. पेठरोडवर तर सायंकाळच्या सुमाराला दैनंदिन रस्त्याच्या दुतर्फा भाजीबाजार भरतो.या भाजीबाजाराची व्याप्ती इतकी वाढलेली आहे की भाजीपाला खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना रस्त्यातच वाहने उभी करावी लागतात. झोपडपट्टीचा परिसर असल्याने अनेकदा या रस्त्यावर लहान मुले खेळतात त्यातच वाहनांची ये-जा त्यामुळे अनेकदा वाहनांचा धक्का लागून किरकोळ अपघात होऊन त्यातून शाब्दिक वादावादी सुरू असल्याचे दिसून येते.या भाजीबाजारांमुळे नागरिक त्रस्तझाले आहेत. नवीन जागेची निश्चिती आणि बाजारांचे स्थलांतर कधी होणार असा प्रश्न केला जात आहे.दिंडोरीरोडवर सायंकाळच्या सुमारास निमाणी बसस्थानकाकडे येणाºया रस्त्यावर भाजीबाजार सुरू होतो. याच ठिकाणी प्रवासी काळ्या टॅक्सी उभ्या असतात तर निमाणी बसस्थाकाजवळच्या पादचारी मार्गावर नागरिक कमी आणि हातगाड्या अधिक असे चित्र दिसते. त्यामुळे रस्त्याने पायी जाणाºया पादचाºयांना जागा नसल्याने त्यांना पायी जाताना जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागते.पंचवटीच्या अन्य अनेक भागात अशाप्रकारे रस्त्यावर भाजीबाजार वाढत आहे. नागरिकांची ती गरज असली तरी महापालिकेच्या वतीने कोणत्याही प्रकारचे नियोजन केले जात नाही. काही वर्षांपूर्वी महापालिकेच्या वतीने सोसायटी परिसरातील खुल्या जागांमध्ये पाच टक्के जागा भाजी विक्रेत्यांसाठी सोडण्याबाबत बंधनकारक करण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र त्यावर पुढे कार्यवाही झालेली नाही.एकीकडे रस्त्यावर भाजीबाजार भरत असताना दुसरीकडे गंगाघाटावरील भाजीपाला विक्रेत्यांसाठी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करू न आयुर्वेद महाविद्यालयासमोर भाजीमंडई उभारली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भाजीमंडईत विक्रेते येतच नसल्याने सध्या बेघर तसेच भिकाºयांनी या मंडईचा ताबा घेतलेला आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या भाजीमंडईची पाहणी करून भाजी विक्रेत्यांना भाजीमंडईत स्थलांतराचे आदेश दिले होते. त्यानुसार मनपाने भाजीमंडईची साफसफाई केली होती, मात्र त्यानंतर कोणतीही कृती झालेली नाही. भाजीमंडईची इमारत सध्या धूळ खात पडून असल्याने तूर्तास पालिकेने केलेल्या भाजीमंडईचा खर्च वाया गेल्याचे दिसत आहे.

टॅग्स :vegetableभाज्याMarketबाजारNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका