सध्या शहरात कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जात आहे, त्या पार्श्वभूमीवर शासनाने दखल घेत महापालिकेच्या आयुक्तपदी जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका शाखेचे जिल्हा प्रशासन अधिकारी भालचंद्र गोसावी यांची आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. नवनियुक्त आयुक्त गोसावी यांच्यापुढे बायोमायनिंग प्रकल्प, आउटसोर्सिंग ठेका, कोरोनाची वाढती रुग्णसंख्या, व प्रशासकीय शिस्त लावण्याचे मोठे आव्हान असणार आहे. दरम्यान, बदलापूर नगर पालिका टीडीआर घोटाळा प्रकरणी आरोप असलेल्या भालचंद्र गोसावी यांची मालेगाव महानगर पालिकेच्या आयुक्त पदी नियुक्ती झाल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या नियुक्तीमुळे मालेगावकरांवर मोठा अन्याय झाला असल्याचे आम्ही मालेगावकर संघर्ष समितीचे निखिल पवार यांनी कळविले आहे. तर या नियुक्तीचे पडसाद उमटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मालेगाव महानगरपालिका आयुक्तपदी भालचंद्र गोसावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 4:15 AM