मनमाड : भालूर येथील जनता विद्यालयात विज्ञान छंद मंडळाची स्थापना करण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक वाय. सी. जाधव होते.विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची आवड निर्माण व्हावी व शास्त्रीय दृष्टिकोन तयार व्हावा या हेतूने मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. आजच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी विज्ञानाकडे आकर्षित व्हावे, असे आवाहन विज्ञान शिक्षक एन. व्ही. गोटे यांनी केले. एच. टी. परदेशी यांनी विज्ञान विषयाचे महत्त्व विशद केले. या मंडळाची विद्यार्थ्यांची कार्यकारिणी निवडण्यात आली. अध्यक्ष सुजाता माधव निकम, कार्यवाहक शीतल सयाजी मडके, खजिनदार कोमल ज्ञानेश्वर अहेर, तर माधुरी शांताराम हारदे, राणी रावसाहेब निकम, भूषण राजेंद्र तळेकर हे सभासद आहेत. यावेळी एस.व्ही. बोरगुडे, पी.एम. शिंदे, डी.एम. भिलोरे, एस.वाय. भदाणे, एस.डी. कदम, एस.पी. पवार यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रंसचालन सुजाता निकम या विद्यार्थिनीने केले. (वार्ताहर)
भालूरला विज्ञान छंद मंडळाची स्थापना
By admin | Published: July 22, 2014 10:15 PM