!मनमाड : भालूर प्राथमिक शाळेवर नेहमीप्रमाणे शिक्षक उशिराने पोहचल्याने जागृत पालकांनी त्या शिक्षकांना आवारात प्रवेश करण्यास मज्जाव केला. वर्गखोल्यांच्या किल्ल्या त्या शिक्षकांकडे असल्याने परिणामी वऱ्हांड्यातच चिमुकल्यांची शाळा भरली. तीन शिक्षक रजेवर तर तीन शिक्षक उशिराने आल्याने केवळ एकाच शिक्षिकेने शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना ज्ञानदानाची जबाबदारी पार पाडली. सदर प्रकाराबाबत दुसऱ्या दिवशी जाब विचारावयास गेलेल्या ग्रामस्थांना ‘कोण म्हणतंय गुरुजी उशिराने आले, असा प्रतिप्रश्न विचारत शासकीय कामात हस्तक्षेप करू नका,’ असा सज्जड दम देत या लेट लतीफांनी घूमजाव केल्याचे सांगण्यात येत असले तरी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने मात्र तीन शिक्षक उशिरा आल्याचे मान्य करत त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले.भालूर प्राथमिक शाळेवर कार्यरत असलेले बहुतांश शिक्षक मनमाड व नांदगाव येथे वास्तव्यास असून, तेथूनच शाळेवर ये-जा करतात. नेहमीच उशिरा पोहचणाऱ्या या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. गेल्या शुक्रवारी एकच शिक्षिका शाळेवर हजर होत्या. (वार्ताहर)
भालूर : कोण म्हणतंय गुरुजी उशिरा आले;
By admin | Published: December 19, 2014 11:23 PM