चांदोरी : चितेगावच्या उपसरपंचपदाच्या निवडीत दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाली. सरपंचांनी दिलेल्या निर्णायक मतामुळे सुनील तुकाराम भंबारे यांची उपसरपंचपदी निवड झाली.उपसरपंच निवडीसाठी सरपंच सुभाष गाडे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेण्यात आली. यावेळी सरपंचासह चौदा सदस्य हजर होते. सुनील भंबारे व नंदलाल दळवी यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नागपुरे व ग्रामसेवक शिरोरे यांनी काम पाहिले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य केशव गाडे, छाया गाडे, योगीता गाडे, कल्पना भंबारे, वंदना मंडलिक, विनता पिंगळ, वैशाली शेलार, मंगला पवार, सुभाष ठाणगे, महादू चारोस्कर, नंदलाल दळवी, किरण गाडे, तुकाराम खैरे, शरद शेलार, संदीप भंबारे, शंकरराव शेलार, शिवाजी भंबारे आदी उपस्थित होते.
या नियमानुसार सरपंचांचे मतदान
जुलै २०१८च्या परिपत्रकानुसार हात वर करून मतदान घेण्यात आले. सुनील भंबारे यांना व नंदलाल दळवी यांना प्रत्येकी सात मते मिळाली. दोघांनाही समान मते मिळाल्याने जुलै २०१६ च्या अवर सचिव संतोष कराड यांच्या शासन परिपत्रकानुसार सरपंचाना मिळालेल्या अधिकारानुसार निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अध्यक्षाचे निर्णायक मत वापरून मतदान घेतले. त्यानुसार, सरपंचांना पुन्हा एकदा निर्णायक मताचा अधिकार वापरता आला. यामुळे भंबारे यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली.