खमताणे : ‘येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट, खंडेराव महाराज की जय’च्या जयघोषात भंडार- खोबऱ्याची मुक्त उधळण करीत खमताणे (ता. बागलाण) येथील खंडेराव महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. यावेळी खंडेराव महाराजांचा यात्रोत्सव साजरा करण्यात आला.गुढीपाडवा व नववर्षाच्या स्वागताने यात्रेस प्रारंभ करण्यात आला. सकाळी खंडेराव महाराज व राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांच्या प्रतिमेची पालखी मिरवणूक काढण्यात आली . मिरवणूक मार्गात सुवासिनींनी विविध ठिकाणी सडा रांगोळ्या रेखाटून स्वागत केले. जागोजागी पालखीचे पूजन करण्यात आले. मिरवणुकीत विठ्ठल साबळे, यशवंत भगत आदी भक्तांनी सादर केलेला खंडेराव महाराज, बाणू, म्हाळसा यांच्या वेशभूषेतील जिवंत देखावा भाविकांचे लक्ष वेधून घेत होता. यात्रेनिमित्त पारंपरिक पद्धतीने यंदाही बारागाड्या ओढण्याचा कार्यक्र म पार पडला. यंदाचा बारागाड्या ओढण्याचा मान विठ्ठल सखाराम साबळे यांना मिळाला आहे. सर्व भाविकांनी बारागाड्या ओढण्याचा आनंद घेतला. खंडेराव महाराज मंदिरासमोर भंडार-खोबºयाची मुक्त उधळण करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत जागरणाचा कार्यक्र म सुरू होता. यात्रेनिमित्त विविध खेळणींची दुकाने मंदिर परिसरात थाटण्यात आली होती. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. (०८ खमताणे खंडेराव महाराज)
मल्हारवाडीत यात्रोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 5:42 PM
खमताणे : ‘येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट, खंडेराव महाराज की जय’च्या जयघोषात भंडार- खोबऱ्याची मुक्त उधळण करीत खमताणे (ता. बागलाण) येथील खंडेराव महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. यावेळी खंडेराव महाराजांचा यात्रोत्सव साजरा करण्यात आला.
ठळक मुद्देगुढीपाडवा व नववर्षाच्या स्वागताने यात्रेस प्रारंभ करण्यात आला. सकाळी खंडेराव महाराज व राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांच्या प्रतिमेची पालखी मिरवणूक काढण्यात आली .