नाशिक : कोरेगाव भिमा येथील जातीय दंगलीस कारणीभूत ठरलेले मिलींद एकबोटे, संभाजी भिडे यांना त्वरीत अटक करा, दंगलीत नुकसान झालेल्यांना भरपाई द्या आदी मागण्यांसाठी शनिवारी भारिप बहुजन महासंघाच्यावतीने नाशिक सह जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या मुख्यालयी धरणे आंदोलन करून मागण्यांचे निवेदन देण्यात आले.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली तसेच फलक फडकाविले. यावेळी जिल्हाधिकाºयांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १ जानेवारी रोजी भिमा-कोरेगाव येथे झालेल्या दंगलीच्या पार्श्वभुमीवर संपुर्ण राज्यभरातील दलित तरूण व नागरिकांवर मोठय प्रमाणात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. निरपराध दलित तरूणांवर गुन्हे दाखल झाल्यामुळे त्यांचे भावी आयुष्य उध्दवस्त होणार आहे. त्यामुळे सदरचे गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावेत व दलित तरूण आणि नागरिकांना दिलासा देण्यात यावा, दंगलीस जबाबदार असलेले मिलींद एकबोटे आणि संभाजी भि डे यांना तात्काळ अटक करण्यात यावी. भिमा-कोरेगाव येथे अभिवादनासाठी आलेल्या अनुयायांची वाहने फोडण्यात आलाी व जाळण्यात आली त्या सर्व नुकसान झालेल्या वाहनाधारकांचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी एस.सी. एस.टी, एन. टी, ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करण्यात यावी. थकीत शिष्यवृत्ती तातडीने अदा करावी, महाराष्टÑातील सर्व शासकीय खात्यात मागासवर्गीयांचा अनुशेष भरण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. नाशिक बरोबरच शुक्रवारी येवला, दिंडोरी, इगतपुरी, मालेगाव, नांदगाव, सटाणा, त्र्यंबकेश्वर, पेठ, कळवण, निफाड, चांदवड या तालुक्यातही तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून निवेदन सादर करण्यात आले. या आंदोलनात वामनराव गायकवाड, अरविंद जगताप, विनय कटारे, गौतम बागुल, बाबा केदारे, अजय काळे, सम्राट पगारे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.(छायाचित्र आहे)
एकबोटे, भिडेंच्या अटकेसाठी नाशिकजिल्ह्यात भारिपचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 2:33 PM
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली तसेच फलक फडकाविले. यावेळी जिल्हाधिकाºयांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १ जानेवारी रोजी भिमा-कोरेगाव येथे झालेल्या दंगलीच्या पार्श्वभुमीवर संपुर्ण राज्यभरातील दलित तरूण व नागरिकांवर मोठय प्रमाणात गुन्हे दाखल करण्यात आलेले
ठळक मुद्देगुन्हे तातडीने मागे घेण्यात यावेतनुकसान झालेल्या वाहनाधारकांचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी