सोमठाणे ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणूक अतिशय चुरशीची झाली होती. प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत भारत कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा पॅनलला ७ जागा मिळाल्या होत्या, तर विरोधी ग्रामविकास पॅनलला ४ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे सरपंच निवडीकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या होत्या.
सोमठाणे ग्रामपंचायतीचे सरपंच नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव होते. निवडणूक निर्णय अधिकारी संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामसेवक प्रमोद शिरोळे यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांची विशेष सभा बोलविण्यात आली होती.
सरपंचपदासाठी भारत शिवाजीराव कोकाटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला. त्यावर सूचक म्हणून संदीप कुंडलिक धोक्रट यांनी स्वाक्षरी केली होती, तर विरोधी गटाकडून सरस्वती सीताराम धोक्रट यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. निर्धारित वेळेत दोन्ही उमेदवारांनी माघार न घेतल्याने मतदान घेण्यात आले. त्यात भारत कोकाटे यांना ७ तर सरस्वती धोक्रट यांना ४ मते मिळाली. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी सरपंचपदी भारत कोकाटे यांच्या नावाची घोषणा केली, तर उपसरपंचपदी मंगला संजय धोक्रट यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यावर सूचक म्हणून जयश्री जालिंदर कोकाटे यांची स्वाक्षरी होती. उपसरपंचपदी केवळ एक उमेदवारी अर्ज आल्याने उपसरपंचपदी मंगला धोक्रट यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
विशेष सभेस ग्रामपंचायत सदस्य मीना माळी, सुनीता कोकाटे, महेंद्र कोकाटे, साहेबराव साळवे, विकास माळी उपस्थित होते. सरपंचपदी भारत कोकाटे यांचा विजय होताच, कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत आनंदोत्सव साजरा केला.
फोटो - २५ सोमठाणे सरपंच
सिन्नर तालुक्यातील सोमठाणे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भारत कोकाटे, तर उपसरपंचपदी मंगला धोक्रट यांची निवड झाल्यानंतर जल्लोष करताना सहकारी ग्रामपंचायत सदस्य.
===Photopath===
250221\25nsk_37_25022021_13.jpg
===Caption===
फोटो - २५ सोमठाणे सरपंच सिन्नर तालुक्यातील सोमठाणे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भारत कोकाटे तर उपसरपंचपदी मंगला धोक्रट यांची निवड झाल्यानंतर जल्लोष करतांना सहकारी ग्रामपंचायत सदस्य.