नाशिक : सृजन संगीत नृत्य विद्यालय आणि साहित्य प्रसार केंद्र आयोजित सृजनोत्सव हा कार्यक्र म परशुराम सायखेडकर नाट्यगृहात मोठ्या दिमाखात सादर झाला.या वार्षिक स्नेहसंमेलनाचे हे १०वे वर्ष असून, भरतनाट्यम् नृत्यांगना गुरू शिल्पा देशमुख यांच्या गुणी विद्यार्थ्यांनी कार्यक्र म सादर केला. कार्यक्र मप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कवी सी. एल. कुलकर्णी व सामाजिक कार्यकर्त्या शुभदा देसाई उपस्थित होते. या कार्यक्र मात भरतनाट्यम् या शास्त्रीय नृत्यातील पारंपरिक रचना नृत्य विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सादर केल्या. कार्यक्र माची सुरु वात गणपती श्लोकाने झाली. त्यानंतर सरस्वतीला वंदन करण्यात आले.कार्यक्र मात ओडिस व कथक नर्तक अजय शेंगडे यांनी ओडिसी प्रकारातल्या काही पारंपरिक रचना सादर केल्या. तर शिल्पा देशमुख व अजय शेंगडे यांनी कवी धर्मवीर भारती यांची तुम मेरे कौन हो कनु ही कविता स्वत:च्या अनोख्या शैलीत पेश केली.कार्यक्र माचे प्रास्ताविक व संगीत संयोजन शास्त्रीय संगीत गायक प्रीतम नाकील यांनी केले. तर पखवाज साथसंगत- दिगंबर सोनावणे यांची लाभली. या कार्यक्र माला साहित्य प्रसारचे मिलिंद कुलकर्णी, अर्चना कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले.गीतम, कौतुकम- कीर्तनम, पदम या रचनांचे विद्यार्थिनींनी उत्तम सादरीकरण केले. यातील काही रचना शुद्ध नर्तनाच्या तर काही अभिनयाच्या होत्या. अभिनय व नृत्याचा संगम असणारी वर्णम ही रचना सादर झाली. शंकर आणि पार्वतीचं कोण कवाड उघिडतो हे पदम सादर झाले. त्याचसोबत विविध रचना सादर केल्या. उत्तरार्धात राम गणेश गडकरी यांची ‘प्रेम आणि मरण’ ही कविता सादर झाली.
भरतनाट्यम् नृत्याचा सृजनोत्सव रंगला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 1:21 AM