शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची चौथी उमेदवार यादी जाहीर, अंधेरीत उमेदवार बदलला; कुणाला मिळाली संधी?
2
विद्यमान आमदाराचा पत्ता कट! शिंदेंनी माजी खासदाराला दिली विधानसभेची उमेदवारी
3
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महाविकास आघाडीत जागावाटपात घोळ? सोलापूरात एकाच जागेवर ठाकरेंचा अन् काँग्रेसचा उमेदवार
4
हैदराबादमध्ये फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग, ८ वाहने जळून खाक
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सस्पेन्स संपला! आदित्य ठाकरेंविरोधात शिंदेंचा उमेदवार ठरला; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
6
मनसेने जाहीर केली सहावी यादी; अशोक चव्हाणांच्या मुलीविरोधात 'हा' उमेदवार मैदानात
7
Maharashtra Election 2024: "...पण काही लोकांबद्दल मला दुःखही आहे", फडणवीस असं का म्हणाले?
8
महायुतीच्या जागावाटपात रिपब्लिकन पक्ष अद्यापही वेटिंगवरच; आठवले नाराज, फडणवीसांनी दिला मोठा शब्द
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत मानसिंगराव नाईक की सत्यजित देशमुख, कोण मारणार बाजी? महाडिक बंडखोरीच्या तयारीत
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, मविआ'ला खोचक टोलाही लगावला
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : इंडिया आघाडीमध्ये फूट? विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव उमेदवार उभे करणार; महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार
12
Maharashtra Election 2024: शरद पवार- एकनाथ शिंदेंच्या 'या' उमेदवारांनी घेतली जरांगेंची भेट
13
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
14
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
15
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
17
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
18
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
19
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
20
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा

भरधाव कारच्या धडकेत पादचारी वृध्दा ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 6:45 PM

मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरातील २५ ते ३० पोते संसारउपयोगी साहित्य चोरून नेले. याप्रकरणी गंगापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देदोघांकडे धारदार चाकू आढळून आले.

नाशिक :अपघातात ७९ वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.७) रात्री द्वारका येथे घडली.सावित्रीबाई पुंजा (७९, रा. मोठा राजवाडा, द्वारका) असे या अपघातातमृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलीसांनी दिेलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री द्वारका येथील देवी मंदिरा समोर सावित्रीबाई या पायी जात असताना आलेल्या चारचाकीने त्यांना जोराची धडक दिली. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी संजय शिरसाठी यांच्या फिर्यादीनुसार भद्रकाली पोलीस ठाण्यात अज्ञात कारचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक निरिक्षक डी. डी. इंगोले करत आहेत.

तडीपाराची पोलीसांना धक्काबुक्कीनाशिक :  तडीपार असतानाही शहरात वावरणार्‍या सराईतास पकडण्यासाठी गेलेल्या पेलीसांना तडीपारासह त्याच्या साथीदाराने धक्काबुक्की केल्याचा प्रकार मंगळवारी (दि.९) सायंकाळी गंगावाडी भागात घडला.जितेंद्र रविंद्र शेथे (२३, रा. सरदार पोलीस चौकीसमोर, पंचवटी) व अवधुत सुनिल जाधव (१९, रा. दत्तमंदिर, शिवशक्तीचौक, नवीन नाशिक) अशी या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस कर्मचारी नितीन नेटारे यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार जितेंद्र शेटे यास तडीपार केलेले असतानाही तो शहरात फिरत असल्याची माहिती होती. त्यानुसार नेटारे व त्यांचे सहकारी त्यास पकडण्यासाठी गेले असताना त्यास ताब्यात घेताना शेटे व जधव यांनी नेटारे यांना धक्काबुक्की केली. तसेच दोघांकडे धारदार चाकू आढळून आले. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात सरकारी कामात आडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक निरिक्षक चौधरी करत आहेत.महात्मानगरला घरफोडीनाशिक : कुटुुबिय घरी नसल्याचा फायदा उचलत घरफोडी करून चोरट्यांनी संसारउपयोगी साहित्य चोरून नेल्याचा प्रकार सोमवारी रात्री घडला.किर्तीकुमार उत्तमलाल पांचाळ (पुर्ण नाव पत्ता नाही) व त्याचे साथीदार असे संशयितांचे नाव आहे. याप्रकरणी गौतम कांतिलाल हिरण (५२, रा. अशोकामार्ग, टागोरनगर) यांनी तक्रार दिली आहे. त्यांचे माहत्मानगर येथील जिऑन एलेजा अपार्टमेंटमध्ये असलेल्या घरी सोमवारी रात्री पांचाळ व त्याच्या सकाहर्‍यांनी खिडकीचा दरवाजा वाकवून आत प्रवेश केला. मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरातील २५ ते ३० पोते संसारउपयोगी साहित्य चोरून नेले. याप्रकरणी गंगापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक निरिक्षक वैसाणे करत आहेत.

 

 

 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयAccidentअपघातDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारी