विंचूर - प्रकाशा मार्गावरून मोठ्या प्रमाणात राज्य व आंतरराज्य वाहतूक सुरू असते. यात अवजड वाहनांचे प्रमाण लक्षणीय आहे. या रस्त्यावर भावडघाट ते माळवाडीदरम्यान कापशी, भावडे, मकरंदवाडी, रामेश्वर, गुंजाळनगर, देवळा व माळवाडी आदी गावे येतात. सुमारे १२ किमी मार्गावर अपघातांचे प्रमाणात वाढत असून, अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. ठिकठिकाणी योग्य ते सूचनाफलक व दिशादर्शक नसल्यामुळे वाहनचालकांना धोक्याचा अंदाज येत नाही. भावडघाटाकडून देवळ्याकडे तीव्र उतार असल्याने वाहने सुसाट गतीने येतात. यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने तसेच समोरून येणाऱ्या व ओव्हरटेक करताना वाहनाच्या गतीचा अंदाज न आल्यामुळे सातत्याने अपघात होत आहेत. दुचाकीस्वारांसाठी तर हा रस्ता मृत्यूचा सापळा ठरत असून, सर्वाधिक अपघात दुचाकींचे होत आहेत. महिनाभरात भाऊसाहेब खंडू देवरे, पत्रकार अमित पाटील, प्रतीक जयराम आहेर आदी दुचाकीस्वारांना ह्या मार्गावर झालेल्या अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे.
इन्फो
रस्त्याची रुंदी कमी
रस्त्याची रुंदी कमी असल्याने वाहनांना ओव्हरटेक करणे धोकादायक ठरत आहे. ह्या रस्त्यालगत भावडे, मकरंदवाडी, रामेश्वर फाटा, गुंजाळनगर, देवळा येथे महाविद्यालय व शाळा आहेत. ह्या रस्त्याला भावडघाटाकडून तीव्र उतार असल्यामुळे वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी गतिरोधक टाकणेदेखील अपघाताला आमंत्रण देणारे ठरू शकते. गुंजाळनगर येथे गतिरोधक टाकल्यामुळे वाहनांच्या वेगावर थोडीफार मर्यादा येते. परंतु ते पुरेसे नाही. भावडघाट ते माळवाडीपर्यंत या १२ किमी मार्गाचे विस्तारीकरण करून रस्ता दुभाजक टाकल्यास वाहनांना शिस्त लागून अपघातांना आळा बसेल.
फोटो - ०५ भावडघाट
विंचूर - प्रकाशा मार्गावर माळवाडी येथील पुलाच्या कठड्याला धडकल्यामुळे ट्रकला झालेला अपघात.
===Photopath===
051220\05nsk_27_05122020_13.jpg
===Caption===
विंचूर प्रकाशा मार्गावर माळवाडी येथील पुलाच्या कठड्याला धडकल्यामुळे ट्रकला झालेला अपघात.