नाशिक : नात्याने भावजयी असलेल्या महिलेकडे विश्वासाने दिलेली रक्कम, कपाटाची किल्ली व अन्य महत्त्वाचे कागदपत्रे असलेली बॅग सांभाळण्यासाठी दिली असता भावजयीने तिच्या पतीसोबत मिळून संगनमताने कपाटाच्या दरवाजाचे कुलूप उघडून दागिण्यांसह रोकड असा पावणेदोन लाखांचा ऐवज लूटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी दोघांविरूध्द म्हसरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.म्हसरूळ गावातील गुलमोहर नगर येथे राहणाऱ्या स्नेहा भटू कांकरिया या महिलेने म्हसरूळ पोलिस ठाण्यात तक्र ार दाखल केली आहे. कांकरिया गुलमोहर नगरला अभिषेक विहार इमारतीत वास्तव्यास आहेत. त्या मागील वर्षी नोव्हेंबर राजस्थान राज्यातील जोधपूर येथे मुळ गावी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी घराची किल्ली, रोकड अन्य वस्तू भावजयी संशयित दिपाली रामदास वैष्णव (रा. दत्तनगर, पेठरोड) हिच्याकडे दिली होती. दिपालीने तिचा पती संशयित रामदास वैष्णवसोबत संगनमत करून फिर्यादी कांकरिया यांच्या घराचे कुलूप उघडून कपाटातील रोख रक्कम, दागिण्यांचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. कांकरिया घरी परतल्यानंतर घरातील कपाटात असलेले दागिने, रोकड व चारचाकी वाहनाचे दस्तऐवज अन्य वस्तू जागेवर नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात भावजयी व भावाविरूध्द तक्र ार दाखल केली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.
भावजयीने नणंदच्या घरातील पावणेदोन लाखांचे दागिणे लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2020 2:45 PM
म्हसरूळ गावातील गुलमोहर नगर येथे राहणाऱ्या स्नेहा भटू कांकरिया या महिलेने म्हसरूळ पोलिस ठाण्यात तक्र ार दाखल केली आहे.
ठळक मुद्देपावणेदोन लाखांचा ऐवज लूटल्याची धक्कादायक घटना