सिन्नर : येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मुख्य पोस्ट कार्यालयातील पोस्टमास्तर व पोस्टल कर्मचारी यांनी इमारतीच्या छतावर पक्ष्यांच्या दाणा-पाण्याची व्यवस्था करून माणुसकीचे दर्शन घडविले आहे. आपल्या दैनंदिन ताणतणावाच्या कामातून वेळ काढून भूतदया दाखविणाºया पोस्टल कर्मचाऱ्यांनी सेवाभाव जपला आहे.इमारतींचे जंगल उभे राहिल्याने पक्ष्यांना झाडावर आधार शोधावा लागत आहे. येथील पोस्ट आॅफिसची इमारत जुनी असून, आवारात उंच झाडे आहेत. त्यामुळे याठिकाणी अनेक पक्षी विसावा घेतात. उन्हाच्या तीव्रतेने चिमणी, कावळा, साळुंकी या पक्ष्यांचे पाण्याअभावी हाल होत असून, ते जीव वाचविण्यासाठी धडपड करीत असल्याचे जाणवले.येथील मुख्य पोस्ट कार्यालयातील पोस्टमास्तर रामसिंह परेदशी व पोस्टल कर्मचारी यांनी कार्यालयाच्या इमारतीवर व परिसरात त्यांच्यासाठी दाणा-पाण्याची सोय केली आहे.वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे पक्ष्यांचा किलबिलाट कमी झाल्याचे पोस्ट मास्तर रामसिंह परदेशी यांच्या लक्षात आले. परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयातील कर्मचारी बी.डी. दराडे, एकनाथ बेदाडे व ज्ञानेश्वर झगडे यांनी कार्यालय इमारतीच्या गच्चीवर, कथड्यांवर पक्ष्यांसाठी दाणा-पाण्याची व्यवस्था केली. अमोल गवांदे यांच्या सूचनेनुसार टाकावूपासून टिकावू या प्रमाणे चहा पिण्याचे यूज अन् थ्रो ग्लास, लस्सीचे ग्लास, थर्माकॉलची पत्रावळ, श्रीखंडाचे प्लॅस्टिकचे डब्बे, पाण्याच्या बॉटल अशा टाकावू वस्तू गोळा केल्या. जे.बी. जगताप यांनी त्या वस्तू कठड्यावर घट्ट चिटकवल्या.त्या बनवलेल्या वस्तूंमध्ये पाणी व दाणे ठेवले. तसेच परिसरातील झाडांच्या बुंद्यापाशी प्लॅस्टिकच्या बॉटल्स् कापून त्यात पाणी भरून ठेवले. आता या ठिकाणी भरलेल्या दाणा-पाण्याच्या भांड्याजवळ परिसरातील पक्षी येताना दिसत आहेत.आपल्या दैनंदिन पोस्टाच्या कामाबरोबरच श्याम कुमार, मनोज नांदूरकर, समाधान एखंडे, मिलिंद सोनवणे आदींसह कर्मचारी या पक्ष्यांची काळजी घेत आहेत.त्यामुळे पोस्ट कार्यालयात येणारे ग्राहकही कर्मचाºयांचे कौतुक करत आहेत. पोस्ट कार्यालयाच्या प्रांगणातील झाडांवर मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचे प्रमाण आहे. मात्र उन्हाची तीव्रता वाढल्याने पक्ष्यांचा किलबिलाट कमी झाला होता. दाण्या-पाण्यावाचून त्यांचे हाल होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सर्व पोस्ट कर्मचाºयांनी पक्ष्यांच्या दाण्या-पाण्याची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला. छतावर झाडांची सावली येते. याठिकाणी टाकावू भांड्यापासून पक्ष्यांना पाणी व दाणे ठेवता येईल, अशी व्यवस्था केली. त्यामुळे पक्ष्यांचा किलबिलाट पुन्हा घुमू लागला आहे.- रामसिंह परदेशी,पोस्ट मास्तर, सिन्नर
दैनंदिन कामातून पशुपक्ष्यांचेही भान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 1:07 AM
सिन्नर : येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मुख्य पोस्ट कार्यालयातील पोस्टमास्तर व पोस्टल कर्मचारी यांनी इमारतीच्या छतावर पक्ष्यांच्या दाणा-पाण्याची व्यवस्था करून माणुसकीचे दर्शन घडविले आहे. आपल्या दैनंदिन ताणतणावाच्या कामातून वेळ काढून भूतदया दाखविणाºया पोस्टल कर्मचाऱ्यांनी सेवाभाव जपला आहे.
ठळक मुद्दे सिन्नर : पोस्ट कर्मचाऱ्यांनी ताणतणावातून जपली ‘भूतदया’