घोटी - इगतपुरी नागरपालिकेच्या निवडणुकीच्या पाशर््वभूमीवर आज प्रचाराचा अखेरचा दिवस गृहीत धरून सर्वच राजकीय पक्षांनी आपले शक्तीप्रदर्शन केले. यात शिवसेनेने काढलेल्या रॅलीने इगतपुरीकरांचे लक्ष वेधून घेतले.यात अभिनेते होम मिनिस्टर फेम भावोजी आदेश बांदेकर यांचा रोड शो घेण्यात आला.इगतपुरी नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी रॅली, रोड शो, चौक सभा घेत शक्ती प्रदर्शन केले. या रॅलीत शिवसैनिक महिला पुरु ष मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रॅलीत जिल्हाप्रमुख विजय करंजकर, उपजिल्हाप्रमुख निवृत्ती, तालुकाप्रमुख भगवान आडोळे, उपतालुकप्रमुख कुलदीप चौधरी, जिल्हा परिषद सदस्य कावजी ठाकरे, हरिदास लोहकरे,विठ्ठल लंगडे,संजय आरोटे,नगरसेवक नानासाहेब देशमुख, अशोक सुरु डे यांच्यासह शेकडो मान्यवर सहभागी झाले होते.
इगतपुरीत शिवसेनेतर्फे भावोजींचा रोड शो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 5:06 PM