गंगापूररोड : आकाशवाणी केंद्राजवळील भाजीबाजाराच्या जागेवरून निर्माण झालेला वाद चौथ्या दिवशीही कायम असून, शुक्रवारी (दि. १३) सायंकाळी भाजीविक्रे त्यांनी हातात वाट्या घेऊन नागरिकांसमोर थेट भीक मांगो आंदोलन केले. दरम्यान, आमदार देवयानी फरांदे तसेच अन्य स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी त्यात तोडगा काढण्याचा केलेला प्रयत्नही फोल ठरला. एआर खाली महापालिका खासगी विकासकाकडून भाजी मंडई विकसीत करून घेत असून त्यात जागा मिळावी यासाठी भाजीविक्र ेत्यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषण व आंदोलनाची दखल घेत प्रभागातील नागरिकांनीही या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिल्याने येत्या काळात हे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. शुक्र वारी सायंकाळी मोठ्या संख्येने प्रभागातील नागरिकांनी येथे गर्दी केली होती. दरम्यान, त्यानंतर सायंकाळी आमदार देवयानी फरांदे, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल,स्थायी समिती समिती सभापती हिमगौरी आडके, योगेश हिरे, स्वाती भामरे आदींनी येथे येऊन आंदोलनकर्त्यांची समजूत काढली. येत्या दोन दिवसांत आयुक्त व बिल्डरशी चर्चा करून तोडगा काढण्यात येईल तोपर्यत आमरण उपोषण मागे घेण्याचे आवाहन आमदार फरांदे यांनी केले; परंतु भाजीविक्र ेत्यांनी नकार दिला. याप्रश्नी शुक्र वारी दुपारी अडीच वाजता पश्चिम विभागाच्या सभापती हेमलता पाटील यांनी उपोषणस्थळी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. यात ६०-४० चा फॉर्म्युला मान्य नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे बैठकीत कोणताही सकारात्मक तोडगा निघू शकला नाही.
नागरिकांसमोर थेट भीक मांगो आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:36 AM